| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ मे २०२५
मनपा मध्ये SCADA प्रणाली च्या वापर होत असल्याने जागेवरील कामाचे मूल्यांकन व उत्तरदायित्व निश्चित करणे सोपे होऊन. दूरस्थ निरीक्षण वरिष्ठ अधिकारी यांना कार्यालयाबाहेर असतानाही प्रणालीवर नजर ठेवता येईल, सर्व कामकाज "लाईव्ह" ट्रॅक होऊ शकते.
मनपाच्या कचरा डेपोवर SCADA प्रणालीची अंमलबजावणी ! उपायुक्त स्मृती पाटील
SCADA प्रणालीमुळे कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता निर्माण होऊन कमी मानवी हस्तक्षेप प्रणाली स्वयंचलित असल्याने चुकीची माहिती देणे, वेळेचा अपव्यय किंवा अकार्यक्षमता यावर नियंत्रण होणार आहे. ही स्मार्ट तंत्रज्ञानाधारित प्रणाली शहरातील कचरा प्रक्रिया आणि वाहतुकीवर रिअल टाइम नियंत्रण व देखरेख ठेवण्यास मदत करणार आहे.
SCADA (Supervisory Control and Data Acquisition) ही एक अत्याधुनिक प्रणाली असून ती विविध प्रकारच्या सेन्सर्स, कॅमेऱ्यांद्वारे माहिती गोळा करते व ती माहिती नियंत्रण कक्षात पाठवते. यामुळे व्यवस्थापन अधिक वेगाने व अचूकतेने निर्णय घेऊ शकते.
समडोळी रोड कचरा डेपो सांगली आणि वड्डी बेडग रोड कचरा डेपो मिरज येथे सुरु करण्यात आली असून प्रणालीद्वारे मिळणाऱ्या आकडेवारीचा वापर करून अधिक योजनाबद्ध आणि खर्चिकदृष्ट्या कार्यक्षम धोरणे राबवली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
घनकचरा व्यवस्थापनात स्मार्ट पाऊल
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकत, घनकचरा व्यवस्थापनावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी समडोळी रोड सांगली आणि वडडी, बेडग रोड मिरज येथे SCADA प्रणाली सुरु केली आहे.
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुणे शहर व इतर शहरे "स्मार्ट व स्वच्छ शहर" या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. आता सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका देखील वाटचाल करत आहे.
उप आयुक्त स्मृती पाटील यांनी या SCADA प्रणाली बाबत माहिती देताना सांगितले की, "SCADA प्रणालीमुळे प्रत्येक कचरा संकलन केंद्रावर काय चालले आहे, वाहने वेळेवर पोहोचत आहेत का, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. “SCADA प्रणालीमुळे डेपो पातळीवर रिअल-टाईम माहिती मिळू लागली आहे. आणि गाड्यांचे नियोजनही अचूक करता येते. हे संपूर्ण शहरासाठी गेमचेंजर ठरेल”,
SCADA प्रणालीचे मुख्य कार्य आणि लाभ:
रिअल-टाईम डेटा संकलन, ऑटोमेटेड रिपोर्टिंग दिवसाअखेरीस किती कचरा संकलित झाला, किती वेळ लागला, किती इंधन वापरले गेले. यावर आधारित अहवाल तयार होतो. दररोज, साप्ताहिक, मासिक कामाचा अहवाल तयार होतो. सदरच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मनपा वतीने कचरा डेपो वरील माहिती अद्यावत केली जाणार आहे. यामुळे महापालिकेचा पैसा, आणि वेळेचा अपव्यय या दोन्हींमध्ये बचत होणार आहे.