| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० डिसेंबर २०२४
साठी नंतरचं वय खरं तर परमेश्वराचं नाम घेण्यात व्यस्त असलेलं. समवयस्क मित्रांच्या गप्पा गोष्टीत व्यतीत करणारं... या वयात शारीरिक समस्या डोके वर काढत असल्याने, जपून पावले टाकणारी काही मंडळी आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो. मात्र अशा मंडळींमध्येही बऱ्याच एव्हरग्रीन व्यक्ती आपणास पहावयास मिळतात. सदैव हसमुख चेहरा, आजारपणाचा बाऊ न करता, आला दिवस आनंदाने घालवायचा, आणि इतरांनाही आनंद द्यायचा हा यांचा दिनक्रम.
अशा मंडळीत अग्रहक्काने घ्यावे असे एक नाव म्हणजे, चिंतामणी बोडस. पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर हा 61 वर्षीय तरुण, सदैव कोणत्या ना कोणत्या कार्यात मग्न. आपल्या मित्रमंडळींना सदैव हसवण्याचा याला छंद. बोडस यांचा आणखी एक छंद म्हणजे सायकलिंग. परंतु हा छंद आपल्या पुरताच मर्यादित न ठेवता, परिचितानाही सायकलींचे महत्त्व पटवून देत त्यांनाही आपल्या सोबत घेणारे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व...
चिंतामणी बोडस यांनी नुकताच सांगली ते आयोध्या हा साडेआठराशे किलोमीटरचा प्रवास अवघ्या बारा दिवसात पूर्ण केला. यावेळी त्यांच्यासोबत सांगली पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मोहन गलांगे हेही सहभागी झाले होते. यानिमित्ताने त्यांच्या शालेय मित्रांनी बोडस यांचा काल त्यांच्या निवासस्थानी ह्रद्य सत्कार केला.
यावेळी रविंद्र आवटी, विश्वास चौगुले, विजय मुळे, शौकत तांबोळी, प्रमोद पतंगे, अशोक मोहिते, अरुण डोंगरे, भरत डोंगरे, अभय जोशी, प्रकाश खेडेकर, कांतीनाथ जोशी, दिलीप काळे, दीपक बनकर आदि मित्रमंडळी उपस्थित होती.
बोडस यांचे मनोगत खालील लिंकवर ऐका...
ॲक्टिव्ह सायकलिंग ग्रुपतर्फेही सत्कार