yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात कोरोनाचे पुनरागमन; खानापूर तालुक्यातील व्यक्ती पॉझिटिव्ह !

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे पुनरागमन; खानापूर तालुक्यातील व्यक्ती पॉझिटिव्ह !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ मे २०२५

सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. खानापूर तालुक्यातील ५५ वर्षांच्या एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर सध्या मिरज येथील बेबील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित व्यक्ती अलीकडेच हिमाचल प्रदेशातून परतलेली असल्याची माहिती समोर आली आहे.


राज्यात इतर काही ठिकाणीही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा धोका पुन्हा उभा राहात असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी व आरोग्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.