| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० मे २०२५
काल सिव्हिल हॉस्पिटल रोडवर आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत उप आयुक्त वैभव साबळे, सहा आयुक्त डॉ प्रज्ञा त्रिभुवन, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद आणि अतिक्रमण टीम यांनी रस्ता वरील अतिक्रमण बाबत मोजमाप करून बाधित होणारे क्षेत्र निश्चित केले.
१५पत्राच्या छपऱ्या, २५ दुकान समोरील अतिक्रमित कट्टे, १ कंपाऊंड काढण्याची कारवाई करीत ३ स्टँडी जप्त करून ताब्यात घेतली आहे. पाहणी अंती बाधित क्षेत्र निश्चित करण्यात आले. अतिक्रमण कारवाई होणार असल्याने संबधितांना ते काढून घेण्याबाबत सूचित केले आहे, उद्या पासून अतिक्रमण बाधित होणारे क्षेत्र काढून टाकण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे,
सहा आयुक्त डॉ प्रज्ञा त्रिभुवन सहदेव कावडे मालमता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी बेकायदेशीर बसविण्यात आलेली खोकी बाबत तपासणी करून कारवाई करण्यासाठी नियोजन केले आहे. या पूर्वी सर्व बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली होती. नव्याने काही खोकी बसविण्यात आली आहेत का ? या बाबत सर्व्हे करून कारवाई होणार आहे.