| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. १८ मे २०२५
होनाई न्यूज व शिव धनुष्य फाउंडेशन यांचा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा तासगाव जाई एक्झिटिव्ह हॉटेल येथे मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. यावेळी सांगली जिल्ह्याचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समडोळी येथील अजित नाभिराज ढोले यांना महाराष्ट्र राज्य आदर्श सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली जिल्हा समाजकल्याण माजी सभापती ब्रह्मानंद (शेठ) पडळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष, लोकनियुक्त सरपंच दाजी (भाऊ)पवार, जेष्ठ पत्रकार कुलदीप देवकुळे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय (दाजी) चव्हाण, अधिकराव (आबा)लोखंडे, उद्योगपती सुहास कुंडले, संदीप(तात्या)ठोंबरे, (कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण) सिनेअभिनेत्री प्रतीक्षा जाधव, दिलीप (आबा) देशमुख आदी मान्यवर उपस्थितहोते.
पाहुण्यांचे स्वागत संपादक व शिवसेना जिल्हाप्रमुख सोशल मीडिया व चळवळीचे नेते अधिकराव आबा लोखंडे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महान व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सलगरचे उद्योगपती सुहास कुंडले, डॉ. सदाशिव कांबळे, युवकनेते विनोद मोरे, खंडू मोरे, पैलवान राहुल रुपनूर, लोकनियुक्त माजी सरपंच तानाजीराव पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष भाजपा संदीप (तात्या) ठोंबरे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हाप्रमुख (शिवसेना) सचिन शेटे, डॉ.संदीप पाटील, अनिल पाटील बेंद्रीकर, डी.बी. बामणे, संतराम मंडले, सुनील तोरणे पोतराज, शिवसेनेचे नेते संभाजी पाटील, मार्गदर्शक दिलीप आबा देशमुख, पैलवान राहुल रुपनर, आगारप्रमुख दयानंद पाटील, डॉ. संतोष सावंत, पत्रकार भगवान जाधव., पोलीस पाटील सचिन भोसले, सागर बाबर, दत्ताभाऊ थोरात, अभिषेक पाटील, शाहुवाडी. जितेंद्र माने, धनाजी गुरव शिवारे, यासह प्रशासन अधिकारी व कोल्हापूर, सातारा, सांगली, राधानगरी, मुंबई, पुणे, चंदगड जिल्ह्यातून अनेक मान्यवर पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यावेळी सूत्रसंचालन पत्रकार गणेश धेडे. पत्रकार अक्षय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके नियोजन होनाई न्यूज पत्रकार टीम व शिवधनुष्य फाऊंडेशन यांनी उत्तमरित्या केले, यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.