yuva MAharashtra सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत भव्य तिरंगा यात्रा, उत्कट देशप्रेमाचा गजर; मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांचा सहभाग !

सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत भव्य तिरंगा यात्रा, उत्कट देशप्रेमाचा गजर; मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांचा सहभाग !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ मे २०२५

पहेलगाम येथे भारतीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम दाखवला. पाकिस्तानला अद्दल घडवली. त्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. उत्कट देशभक्तीचा गजर करीत राष्ट्रप्रेमी सांगलीकरांच्यावतीने ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेत हजारो नागरिकांसह अनेक माजी सैनिकही सहभागी झाले होते. प्रारंभी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते मार्केट यार्ड परिसरातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहण्यात आले. तेथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला.

सैनिकों के सन्मान में हर भारतीय मैदान में, भारतमाता की जय, वंदे मातरम, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय', अशा घोषणा मोठ्या जल्लोषात देत तिरंगा यात्रा निघाली होती. 

पाकिस्तानला धडा शिकवीत भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रमाचे दर्शन घडवले. त्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ उत्कट देशभक्तीचा गजर करीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हास्तरीय भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.


यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, भारताच्या सैन्यदलाने पाकिस्तानात घुसून भ्याड दहशतवादी कृत्ये करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे. अत्यंत अतुलनीय शौर्य भारतीय सैनिकांनी गाजविले आहे. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत आता कोणातही राहिलेली नाही हे सिद्ध झाले आहे. हा पूर्वीचा भारत राहिला नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखालील मजबूत भारत देश आहे, हा संदेश जगभर गेला आहे. आमदार गाडगीळ म्हणाले, संपूर्ण देश भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच आम्ही सर्व भारतीय आपल्या पराक्रमी आणि कर्तव्यदक्ष सैन्यदलाबद्दल कृतज्ञ आहोत, हे दर्शवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले, भारतीय सैनिकांच्या पराक्रमापुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा सूड सैनिकांनी घेतला. त्यामुळे संपूर्ण देशभरात समाधानाचे वातावरण आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रप्रेमी सांगलीकरांनी उत्स्फुर्तपणे तिरंगा यात्रेत सहभाग घेतला आहे. हुतात्मा स्मारक येथे सुरू झालेली ही तिरंगा यात्रा त्रिकोणी बागेतील शहीद स्मारक येथे विसर्जित झाली.

या तिरंगा यात्रेत आमदार गाडगीळ, भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष ढंग, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंदभाऊ देशपांडे, भाजप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाशतात्या बिरजे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर, भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा माजी महापौर संगीताताई खोत, प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका भारती दिगडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य पांडुरंग कोरे, अविनाश मोहिते, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, सांगली शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष तथा माजी नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील, माजी नगरसेविका सोनाली सागरे, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, लक्ष्मणभाऊ नवलाई, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, प्रवीण जाधव, राजेश चव्हाण, गीताताई पवार, हरीपूर ग्रामपंचायत सदस्य गणपती साळुंखे, सर्व मंडल अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी तसेच समस्त सांगलीकर, समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक, माजी सैनिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.