yuva MAharashtra सांगलीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

सांगलीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

               फोटो सौजन्य  : दै. ललकार 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २४ जुलै २०२५

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या निमित्ताने सांगली शहर जिल्हा कार्यालयासमोर आमदार इद्रीस नायकवडी, जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत केक कापून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदवून आपल्या नेत्याबद्दलचा प्रेमभाव दाखवला.

वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या विविध आघाड्यांनी एक आठवड्याचा कार्यक्रम आखला असून, पहिल्याच दिवशी केक कापणे, वृक्षारोपण, खाद्यपदार्थांचे वाटप आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण अशा विविध उपक्रमांना सुरुवात झाली.

अल्पसंख्याक विभागाच्या पुढाकाराने फिरदौस कॉलनी, शामरावनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तर मिरजमधील महापालिका शाळा क्रमांक सहामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले. सह्याद्रीनगर येथे जिलेबी आणि केक वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमांचे नेतृत्व मुनीर मुल्ला, मोहसिन शेख, तोहिद शेख, जमीर ऐनापुरे आणि फरिदा शेख यांनी केले.

शाळकरी मुलांना खाऊ देण्याच्या उपक्रमात वेलणकर अनाथाश्रमाजवळील फौजदार गल्ली येथे विधानसभा अध्यक्ष बिरेंद्र थोरात सहभागी झाले. कुपवाडच्या नागराज चौकात, तसेच विनायकनगर येथील संजीवनी हनुमान मंदिर परिसरातही वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात आला.

कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे, मुद्दस्सर मुजावर, दाऊद मुजावर आणि सुनिता जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केले. दरम्यान, मिरज एमआयडीसीमध्ये उद्योग आघाडीच्या वतीने आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरही पार पडले.

मिरजेच्या महाराणा प्रताप चौकात माजी नगरसेवक अतहर नायकवडी यांनी केक कापून आपला सहभाग नोंदवला. तर पत्रकार नगरमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला, ज्याचे संयोजन महिला आघाडीच्या प्रदेश संघटक सचिव सुवर्णा पाटील यांनी केले.

सायंकाळी सांगली शहर जिल्हा कार्यालयासमोर केक व जिलेबी वाटपाच्या माध्यमातून एकत्रित कार्यक्रम पार पडला. या सर्व उपक्रमांमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमात आमदार इद्रीस नायकवडी, प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, कार्याध्यक्ष जमील बागवान, विधानसभा अध्यक्ष बिरेंद्र थोरात, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, युवक अध्यक्ष आकाश माने, महिला अध्यक्ष राधिका हारगे, उद्योग आघाडीचे संजय कदम, अल्पसंख्याक अध्यक्ष मुनिर मुल्ला, सांगली शहर अध्यक्षा उषाताई गायकवाड, कुपवाड शहर अध्यक्षा सुनीता जगधने, तसेच अनेक विभागप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हे सर्व कार्यक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारी जपत जनतेशी संवाद वाढवणारे ठरले.