yuva MAharashtra महापालिका शाळेचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले

महापालिका शाळेचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १५ जुलै २०२५

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळामधील ७० विद्यार्थी पात्र ठरले असून, गुणवत्ता यादीत १० विद्यार्थी चमकले आहेत. आयुक्त सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांचे प्रेरणेने, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांच्या उत्कृष्ट नियोजनानुसार सदर विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत.
१)खतीब इक्रा,मनपा शाळा क्रमांक २३ मिरज (जिल्ह्यात २० वी) २)राजमुद्रा चव्हाण , मनपा शाळा क्रमांक २३ सांगली (जिल्ह्यात ४६ वा) ३) शौर्य पांचाळ, मनपा शाळा क्रमांक १९ मिरज (जिल्ह्यात ८७वा ) ४)मकानदार निकाहत, मनपा शाळा क्रमांक १६ मिरज (जिल्ह्यात ११२वा) ५) तोडकर जय, मनपा शाळा क्रमांक ११ मिरज (जिल्ह्यात ११८वा), ६) सक्षम कोलप, मनपा शाळा क्रमांक ७ सांगली (जिल्ह्यात १३१ वा), ७) शेख अवेस, मनपा शाळा क्रमांक २३ मिरज (जिल्ह्यात १४० वा), ८) तस्मिन शेख, मनपा शाळा क्रमांक २३ मिरज, (जिल्ह्यात १४१ वा), ९) मासिरा बारगीर, मनपा शाळा क्रमांक १७ सांगली (जिल्ह्यात १५६ वी), १०) स्वामी आरुषी, मनपा शाळा क्रमांक १९ मिरज (जिल्ह्यात १६८ वी) आली आहे.

 सत्यम गांधी भा.प्र.से. म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यानी यश संपादन केले असून यापुढेही आपल्या यशाचे सातत्य कायम ठेवावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.

सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नजमा मारुफ, मुख्याध्यापक अरुण कदम, मुख्याध्यापक अतिका जमादार, मुख्याध्यापक आयुब पटेल, मुख्याध्यापक शोभा लोहार , मुख्याध्यापक स्मिता सौंदत्ते, मुख्याध्यापक विजय गरंडे, जहांगीर मुल्ला, सुमैय्या मुजावर, राजश्री वाली, दरगोंड पाटील, गुरान्ना बगले, सचिन भोसले, शरद बाटे, गिरीजा घोरपडे, शिवगंगा ठोंबरे, यांच्यासह शंकर ढेरे यांनी मार्गदर्शन केले.

२०१८ पासून दरवर्षी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवली असून दरवर्षी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील संख्या वाढत आहे. २०० पेक्षा जास्त १९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून ७० विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

लेखापाल गजानन बुचडे, कार्यक्रम अधिकारी सतिश कांबळे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख संदिप सातपुते, केंद्र समन्वयक रविंद्र शिंदे, भारत बंडगर, राहुल होनमोरे, धनश्री भाले, पद्मा घोलप, पुजारणी साळुंखे, नसीमा पठाण, आदींनी संयोजन व नियोजन केले.