| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १५ जुलै २०२५
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार मिरज तालुका काँग्रेसची बैठक मिरज तालुक्याचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी सांगली काँग्रेस भवन येथे आज आयोजित करण्यात आली होती सदरच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा डॉ सिकंदर जमादार हे होते.
यावेळी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी बैठकीच्या आयोजनाच्या विषयावर प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी बोलताना खजिनदार सुभाष तात्या खोत यांनी तालुक्यामध्ये काँग्रेसचा मतदार हा काँग्रेसच्या पाठीशी आहे जरी इतर पक्षांमध्ये गेले असतील तरी जिल्हा परिषद पंचायत समितीला काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम व खासदार विशाल दादा पाटील हे निर्णय घेतील जिल्हा परिषद मतदार संघ वाईज प्रत्येक गावामध्ये काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी काँग्रेसचे मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संपर्क दौरा करावा.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर सिकंदर जमादार यांनी खासदार विशाल दादा पाटील यांच्या फंडातून ज्या ज्या गावांमध्ये कामे चालू होतील त्याचे भूमी पूजन व उद्घाटन कार्यक्रम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन करण्यात येईल, यापुढील काळामध्ये जिल्ह्याचे नेते डॉक्टर विश्वजीत कदम व खासदार विशाल दादा पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे रक्षणासाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी आपण एकदिलाने काम करूया असे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संभाजी राजे पाटील, ओबीसी चे तालुकाध्यक्ष संगापा पाटोळे, उपाध्यक्ष आर आर पाटील, टाकळीचे सचिन पाटील, शिरपूरचे रणजित देसाई इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली. शेवटी आभार सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी मांनले.
यावेळी वसंतदादा कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील, सांगली विधानसभा अध्यक्ष आदिनाथ मगदूम, माजी समाज कल्याण सभापती सदाशिव खाडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आणासो खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे, रवींद्र कोलप, इंद्रजीत उर्फ विकी पाटील खंडेराजुरी, कपिल कबाडगे, इराप्पा नाईक, वडीअमोल पाटील, सुनील पाटील गुंडेवाडी, सचिन पाटील टाकळी, शिवाजीराव कनप नरवाड, प्रकाश माने रणजीत देसाई शिपुर, प्रशांत चौगुले पांडुरंग कदम डोंगरवाड, सुनील गुळवणी, अरिफ मालगावे, श्रीनाथ देवकर, सुनील कर्वे, योगेश भोसले, उमेश पाटील इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.