yuva MAharashtra अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय गौरव सोहळा मुंबईत उत्साहात संपन्न

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय गौरव सोहळा मुंबईत उत्साहात संपन्न

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. ३ जुलै २०२५

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन भव्यतेने पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीने हा सोहळा विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

या कार्यक्रमाला अर्थशास्त्रज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, खासदार रामशेठ ठाकूर, किरण नाईक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महेश म्हात्रे, तसेच शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर आणि शिवराज काटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले, तर महेश म्हात्रे यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अभिनेता भरत जाधव यांचाही विशेष गौरव करण्यात आला. या व्यतिरिक्त, अमेय तिरोडकर, अभिजित करंडे, बाळासाहेब पाटील, भरत निगडे, शर्मिला कलगुंटकर यांच्यासह १२ पत्रकारांना विविध सन्मान प्रदान करण्यात आले.

प्रसिद्ध पत्रकार पद्मभूषण देशपांडे, दत्ता बाळसराफ, दिलीप सपाटे (मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष), संदीप चव्हाण (मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष), अभिनेत्री दिपाली बढे कर, लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे, कामगार नेते कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई बढेकर, पत्रकार रवी भिलाणे, संजय शिंदे, अगस्ती लावंड, प्रशांत बारसिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विशाल परदेशी यांनी केले. परिषद अध्यक्ष राजा आदाटे, कार्याध्यक्ष संजय मिस्कीन, उपाध्यक्ष विनायक सानप, सचिव दिपक पवार, कोषाध्यक्ष पांडुरंग म्हस्के पाटील, विभागीय सचिव दिपक कैतके यांच्यासह मुंबई टीममधील तेजस वाघमारे, परेश मोटे, उदय कासारे, सुरेश गायकवाड यांनी हा सोहळा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.