yuva MAharashtra महात्मा गांधींच्या पुतळा विटंबनेचा सांगली येथे कॉंग्रेस सेवादलासह अनेक संघटनेतर्फे निषेध सभा

महात्मा गांधींच्या पुतळा विटंबनेचा सांगली येथे कॉंग्रेस सेवादलासह अनेक संघटनेतर्फे निषेध सभा

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. ११ जुलै २०२५

पुणे येथील महात्मा गांधींजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या विकृत प्रवृतीचा राष्ट्र सेवा दल संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 
      
सांगली येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ राष्ट्र सेवा दल. हिंद मजदूर सभा, संग्राम संस्था, काॅंग्रेस सेवा दल, महात्मा गांधीं ग्रंथालय,सह अनेक संस्था संघटनेच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. 
       
अहिंसेच्या मार्गांनी भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्मा गांधींची हत्त्या करणारी विकृत विचारांची प्रवृत्ती आजही गांधींच्या पुतळ्याची विटंबना करून समाजात विद्वेश पसरवीत आहेत. देशात संविधान व तिरंगा ध्वजाचा सातत्याने अपमान करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात असतांना गुन्हेगारांना आळा घातला जात नाही. असे दिसून येते. या विकृत प्रवृतीचा निषेध आज करण्यात आला. 

   
गांधींच्या प्रार्थनेनी सभेला सुरुवात करून "बार बार मारते है, फिर भी गांधी मरता क्युं नही " असा प्रश्न जणू गुन्हेगारांना पडला असावा असे म्हणत महात्मा गांधी अमर रहे. या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. 

या प्रसंगी सदाशिव मगदूम, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, विकास मगदूम, कॉंग्रेस सेवा दलाचे सुभाष खोत, अजित ढोले, ज्योती आदाटे. आदींनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी डॉ.लताताई देशपांडे, अजित ढोले, प्रा. वासुदेव गुरव, सुधीर पाटील, सुनिता बिरनाळे मगदूम, अनिल मोहिते विठ्ठलराव काळे, अभयकुमार लाड, राजेंद्र कांबळे, अस्लम मुलाणी, अंकुश कोळेकर, शिवाजी दुर्गाडे, वंदना मोहीते, सुधाकर माने, प्रविण कोकरे, दिनकर आदाटे, किरण कांबळे, तेजस नांद्रेकर, अशोक भाऊ पाटील, रेणुका कांबळे, सुलभा होवाळे, कमल शिर्के, शोभा मगदूम, शमशाद नायकवडी, मीना शिंदे शिवाजी पाटील, रोहित शिंदे, हेरंब माळी, रविराज शितोळे, कोमल मगदूम, मोहन देशमुख, अमर खोत इ. अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीतांनी सभेची सांगता करण्यात आली.