yuva MAharashtra आयुष्मान भारत योजनेत महत्त्वाचा बदल: आता 'हे' उपचार फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच !

आयुष्मान भारत योजनेत महत्त्वाचा बदल: आता 'हे' उपचार फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच !

                फोटो सौजन्य  : Wikimedia commons 

| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - सोमवार दि. २८ जुलै २०२५

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत आतापर्यंत सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये विविध आजारांवर मोफत उपचार मिळत होते. मात्र, योजनेच्या धोरणात अलीकडेच काही बदल करण्यात आले असून, काही विशिष्ट आजारांवर आता खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करता येणार नाहीत.

कोणत्या आजारांवर खाजगी रुग्णालयांत उपचार बंद ?

आरोग्य विभागाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, आता मेंदूशी संबंधित विकार, प्रसूती सेवा आणि गर्भाशयावरील शस्त्रक्रिया यासाठी मोफत उपचार सुविधा केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपलब्ध राहील. यापूर्वी हे उपचार खाजगी रुग्णालयांमध्येही मोफत होते, मात्र आता तेथे त्यासाठी रुग्णांना स्वतः खर्च करावा लागेल.

सरकारचा निर्णय का ?

पूर्वी आयुष्मान योजनेअंतर्गत १७६० पेक्षा अधिक आजारांवर मोफत उपचाराची सुविधा देण्यात आली होती. यामध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांचा समावेश होता. मात्र काही आजारांवर सक्षम सुविधा सरकारी रुग्णालयांमध्ये आधीपासूनच उपलब्ध असल्याने, खर्चात बचत आणि सरकारी सेवांचा अधिक वापर होण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आयुष्मान कार्ड कसे काढावे ?

1. आपल्या मोबाईलमध्ये Ayushman Bharat App डाउनलोड करा.

2. पसंतीची भाषा निवडा आणि लॉगिन करा.

3. Beneficiary पर्यायावर क्लिक करा.

4. कॅप्चा कोड आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.

5. Beneficiary Search पेजमध्ये आपले राज्य, जिल्हा, आणि आधार क्रमांक टाका.

6. यादीत नाव दिसल्यास, कार्ड आधीच अस्तित्वात आहे. नाव नसेल, तर Authenticate वर क्लिक करा.

7. OTP टाका, फोटो अपलोड करा, नाते स्पष्ट करा.

8. ई-केवायसी पूर्ण करून अर्ज सादर करा.

9. सात दिवसांत तपासणी पूर्ण होईल व कार्ड ॲपवरून डाउनलोड करता येईल.

आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

मोबाईल क्रमांक

रेशन कार्डपासपोर्ट आकाराचा फोटो

याशिवाय, कामगार ओळखपत्र (जसे की ई-श्रम कार्ड) असल्यास, योजनेच्या पात्रतेची पडताळणी करता येते.

नवीन नियमांमुळे काही रुग्णांना खासगी उपचारांच्या खर्चाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवेचा योग्य उपयोग करताना नव्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून निर्णय घ्यावा.