| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २१ जून २०२५
डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी, कसबे डिग्रज येथील विद्यार्थ्यानी GATE (Graduate -ptitude Test in Engi-neering) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये M.Tech पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.
कु. ऋतुजा संकपाळ, कु. सुजाता बावणे, कु रोहित मस्के आणि कु सिद्धांत अनुगडे या चौघांना IIT हैदराबाद, M. Tech in Oph-thalmic Engineering तर कु अनुपम बहुरे यास छखद अलाहाबाद, M.Tech in Chemical Engineering अभ्यासक्रमासाठी असे एकूण पाच विद्यार्थीचे निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या M.Tech शिक्षणादरम्यान केंद्र शासनामार्फत दरमहा शिष्यवृत्ती (Stipend) देखील मिळणार आहे, जे त्यांना आर्थिक स्थैर्य आणि स्वतंत्र संशोधनासाठी प्रोत्साहन देईल.
GATE ही भारतातील सर्वोत्तम प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे १० ते १२ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात, मात्र त्यापैकी केवळ १७१८% विद्यार्थी पात्र ठरतात. त्यातही IIT आणि NIT सारख्या उच्चस्तरीय संस्थांमध्ये M.Tech साठी जागा केवळ १५,००० ते १८,००० इतक्याच असतात. त्यामुळे या निवडी विद्यार्थ्यांच्या कौशल्य, मेहनत आणि नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे.
फार्मसी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यासाठी GATE परीक्षा ही केवळ एक स्पर्धा नसून, ती Bio-medical Engineering, Ophthalmic Technol-ogy, Chemical Engi neering, Life Sciences, Healthcare Technol ogy यांसारख्या आधुनिक शाखांमध्ये प्रवेशासाठी एक प्रवेशद्वार ठरते. IIT-Bombay, IIT-Hyderabad, IIT-BHU,
IISc Bangalore, NITs यांसारख्या संस्थांमध्ये संशोधन व विकासाच्या क्षेत्रात फार्मसी विवष्यमा विशेष स्थान मिळू लागले आहे.
महाविद्यालयात GATE परीक्षेच्या तयारीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विविध उपक्रम राबवले गेले. विद्यास्यांचे विषयातील मूलभूत ज्ञान भक्कम करण्यासाठी सखोल अध्यापन, तसेच राष्ट्रीय स्तरावरील subject experts d
alumni यांचे मार्गदर्शन सत्रे आयोजित केली गेली. विद्याच्यौना त्यांच्या फार्मसी पार्श्वभूमीशी सुसंगत फोर्स कसे निवडावेत, कोणत्या संस्थांमध्ये अधिक संधी आहेत, अर्ज प्रक्रिया कशी करावी, SOP आणि documentation यासाठीही तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले. या सर्व प्रथानांमुळे विद्याध्यौना केवळ GATE परीक्षा उतीर्ण करता आली नाही, तर त्यांच्या आवडी, क्षमतानुसार आणि करिअर दृष्टिकोनातून योग्य अभ्यासक्रम आणि संस्था निवडता आल्या. हे महाविद्यालयासाठी तसेच सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा विभागांचे प्रमुख डॉ संतोष गेजगे, प्राध्यापक वर्ग प्राचार्य डॉ किरण वाडकर तथा संस्थापक प्रा ही डी चौगुले सर, तीर्थकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व संस्थापक मंडळ यांनी विद्याध्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.