yuva MAharashtra कु. किरण आबिटकर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी;कृषी रसायने आणि किटकशास्त्र विषयात संशोधन

कु. किरण आबिटकर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी;कृषी रसायने आणि किटकशास्त्र विषयात संशोधन


| सांगली समाचार वृत्त |
गारगोटी - शुक्रवार दि. २० जून २०२५

देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या कु. किरण रेखा किशोर आबिटकर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी मिळाली असून त्यांच्या संशोधनाचा विषय- studies on phyto chemical ingredients and their effect on Spodoptera litura and Helicoverpa armigera. (स्टडीएस ऑन फयटोकेमिकल इंग्रेडयंट्स अँड देयर इफेक्ट ऑन स्पोडोपटेरा लिटूरा अँड हेलीकव्हरपा आर्मीजेरा ) असा आहे.

वेगवेगळ्या झाडांच्या पानाचा अर्क काढून त्याचे परीक्षण करून स्पोडोपटेरा लिटूरा अर्थात तंबाखू वरची अळी व हेलीकव्हरपा आर्मीजेरा म्हणजेच हरबऱ्यावरची बोन्ड अळी या दोन किडिंवर त्याचा काय प्रादुर्भाव होतो व त्यापैकी कोणता अर्क या किडीना रोखण्यासाठी उपयुक्ता आहे याचा अभ्यास केला आहे.
  
आपल्या संशोधन विषयी बोलताना किरण आबिटकर म्हणाल्या.. स्पोडोप्टेरा लिटुरा आणि हेलिकॉव्हरपा आर्मिगेरा हे जगभरातील सर्वात विनाशकारी कृषी कीटकांपैकी आहेत. ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पिकांच्या विस्तृत श्रेणीवर हल्ला करतात, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय नुकसान होते आणि रासायनिक कीटकनाशकांचा व्यापक वापर होतो. वनस्पतीजन्य कीटकनाशकांना शाश्वत पिक संरक्षणासाठी स्वीकारार्ह, प्रभावी आणि विश्वासार्ह बनवतात. वनस्पतीजन्य कीटकनाशके पिकांवर आणि पर्यावरणात उरलेला अंश नसल्याने ती ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त मानली जातात.


या समस्येवर उपाय म्हणून सद्याचा अभ्यास निवडक वनस्पतींमधील द्वितीयक चयापचयी घटकांचे विश्लेषण करून स्पोडोप्टेरा लिटुरा आणि हेलिकॉव्हरपा आर्मिगेरा वर त्यांचे जैवप्रभावीपण (bioefficacy) तपासण्यासाठी केंद्रित आहे, जेणेकरून पर्यावरणीय धोके कमी करताना कीटक नियंत्रणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शाश्वत वनस्पती-आधारित कीटक व्यवस्थापन उपाययोजना विकसित करता येतील, असेही त्या म्हणाल्या.

शोधप्रबंध मार्गदर्शक- प्रा. डॉ. पी. डी. शिरागावे. व्हायवा चेअरमन प्रा. डॉ. एस. आर. यंकांची. रेफरी डॉ पी एस मतिवडे असोसिएट डायरेक्टर (रिटायर्ड) एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी धारवाड, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह आणि उपाध्यक्ष डॉ. तृप्तीभाभी शाह देवचंद कॉलेज चे प्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. इंगळे. डॉ. टी. जी. नगराजा. यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे प्रोत्साहन लाभले.