yuva MAharashtra लोकाभिमुख राजांचा शिवराज्याभिषेक - मराठी मनाला उभारी देणारा सोहळा - जिल्हाधिकारी

लोकाभिमुख राजांचा शिवराज्याभिषेक - मराठी मनाला उभारी देणारा सोहळा - जिल्हाधिकारी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ७ जून २०२५ 

छ. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील सर्व धर्मीय बारा बलुतेदार अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य निर्माणाची प्रेरणा दिली. शिवरायांच्या आदर्शाची प्रेरणा सांगलीकरांना कायम मिळत रहावी म्हणून सांगलीत विरेंद्र पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून छ. शिवबांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ ६ जून, २०२२ रोजी छ. संभाजीराजे यांच्या हस्ते प्रज्वलित झालेली आणि रायगडावरून आणलेली संपूर्ण देशातील पहिली अखंड शिवज्योत सांगलीत प्रज्वलित केली. अखंड ३६५ दिवस ती तेवत राहते. त्याचा चतुर्थ वर्धापन दिन आणि ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा सांगलीत साजरा झाला.  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांचा देव्हारा म्हणजे ३० फूटी मेघडंबरी व रायगडाच्या महादरवाजाची प्रतिकृती गेल्या वर्षी उभारण्यात आली होती. ती पहाण्यासाठी सांगलीकर हजारोंच्या संख्येने आले होते.  

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, 'नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेला फक्त एकच मंत्र दिला. महिला, वृध्दाचा आधार, सामान्य रयतेचा वाली शिवबा होत. लोकाभिमुख राजाचा राज्याभिषेक मराठी मनाला उभारी देणारा आहे.'

यावेळी मा. जिल्हाधिकारी काकडे आणि मराठा समाज नूतन अध्यक्ष डॉ. मोहन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज पाटील व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून सर्व शिवप्रेमी सांगलीकरांच्या वतीने अभिवादन केले व अखंड शिवज्योत पूजन करुन तिचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी शिवगर्जना सादर केली.अराध्य जवळेकर या विद्यार्थ्याने शिवगर्जना सादर केली 


स्वागत पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम तर आभार अजय देशमुख यांनी मानले. प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी निवेदन केले. यावेळी सुमित डान्स अकॅडमी सांगली प्रस्तुत शिवगौरव गीतांवर नृत्याविष्काराचा बहारदार कार्यक्रम लक्षवेधी ठरला.  यावेळी विद्युत रोषणाई व लेझर शो मुळे सारा परिसर उजळून निघाला. डीजेच्या आवाजात तरुणाई शिवप्रेमाने बेभान होऊन नाचतानाचे दृश्य विलोभनीय होते. फटाक्यांची आतषबाजी, शिवगर्जना, छ. शिवाजी महाराज की जय, एकच धून सहा जून, जय भवानी - जय शिवाजी.. हरहर महादेव अशा घोषणांनी सांगलीचा आसमंत शिवमय झाला.उपस्थित सर्वांचे तन, मन शिवरायांच्या आठवणीने रोमांचित झाले. 

पृथ्वीराज पाटील फौंडेशन व सर्व शिवप्रेमींनी आयोजित केलेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्यास मराठा समाज अध्यक्ष डॉ. मोहन पाटील, डॉ.संजय पाटील, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, किरण सुर्यवंशी, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, व करीमभाई मेस्त्री, रविंद्र वळवडे, शितल सदलगे, डॉ. राजेंद्र मेथे, बिपीन कदम, अजय देशमुख, सनी धोतरे, श्रीकांत साठे, सुशांत गवळी, संजय सुर्यवंशी, अक्षय शेळके, उत्तम सुर्यवंशी, प्रा. एन.डी.बिरनाळे, अल्ताफ पेंढारी, ताजुद्दीन शेख,ए. डी. पाटील, बाळासाहेब काकडे, अजीजभाई मेस्त्री,भारती भगत, किर्ती देशमुख, सचिन घेवारे, आशिष कोरी, रमेश जाधव, संभाजी पोळ, आयुब निशाणदार, अमोल सुर्यवंशी, रहिम हट्टीवाले, महावीर पाटील, प्रशांत देशमुख, मौला वंटमुरे, दादा शिंदे, रघुनाथ नार्वेकर, अख्तर अत्तार, इसाक मुल्ला, शाबाज नायकवडी, मयूरेश पेडणेकर, पोपट पाटील, आनंद पाटील, राजेंद्र कांबळे, आशिष चौधरी, प्रशांत अहिवळे, संजय सुर्यवंशी, विश्वास यादव,डॉ प्रताप भोसले, आशाताई पाटील सुवर्णा पाटील, प्रितम रेवणकर व शिवप्रेमी मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि सांगलीकर शिवप्रेमी यांनी नीटनेटके आयोजन केले होते.