yuva MAharashtra संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ७ जून २०२५ 

एनडीआरएफ तसेच मनपा अग्निशमन दल यांनी संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व प्रत्यक्ष पूर परिस्थिती बाबत येणाऱ्या समस्या हातळण्याचे प्रात्यक्षिक मा जिल्हाधिकारी अशोक काकडे व मा सत्यम गांधी आयुक्त यांच्या समक्ष दाखवण्यात आले. या वेळी महापुरात बुडणाऱ्यांना बचावकार्य अंतर्गत कराव्याच्या कृती बाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बोटीचे प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले.

एनडीआरएफ टीमचे प्रमुख श्री संतोषकुमार तिवारी व त्यांची २४ जवानांची टीम तसेच अग्निशमन दलाच्या प्रमुख श्री सुनील माळी त्यांची ३१ जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिक दाखविले. मनपाच्या अग्निशमन दलाच्या ७ बोटी यावेळी तयार ठेवण्यात आला होत्था. त्या बरोबर आवश्यकता असलेले सर्व साहित्यासह सर्व टीम उपस्थितीत होती.
 

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणे इत्यादींचे प्रदर्शनं या वेळी मांडण्यात आले होते. मा जिल्हाधिकारी श्री काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणे यांचे प्रदर्शन पाहून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी पूर परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे तसेच देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊन पूर परिस्थिती वर मात करावी असे या वेळी सागितले.

मा सत्यम गांधी आयुक्त यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मनपा प्रशासन महापुरासाठी सर्व तयारीनिशी तयार आहे , आवश्यक ते मनुष्यबळ, साहित्य तसेच पूरबाधित नागरिकाच्या निवा-यासाठी लागणाऱ्या उपाययोजना सर्व तयारी सह आपत्ती साठी आम्ही सज्ज झालो आहे, मनपा टीम तयार आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे, आपत्ती ॲप आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४×७ तयार असणार आहे. संपर्क नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच पूर पातळी बाबत अद्यावत माहिती देखील नागरिकांना देण्यात येणार आहे,

या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त विजया यादव, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद मंडल अधिकारी, तलाठी, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले धनंजय कांबळे याकूब मद्रासी तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.