| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १५ जून २०२५
सांगलीतील आयर्विन पुलाच्या शेजारी उभारल्या जाणाऱ्या नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करून तो नागरिकांच्या वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करावा, अशा सूचना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. आज त्यांनी या पुलाच्या उर्वरित कामांची पाहणी केली.
या निरीक्षणावेळी माजी आमदार दिनकरतात्या पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कीर्तीकुमार मिरजकर, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
आमदार गाडगीळ म्हणाले की, "नवीन समांतर पुलाचे काम गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल आणि नागरिकांची होणारी अडचण दूर होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी प्राधान्याने पावले उचलावीत."
पुलाच्या कामास आता वेग मिळणार असल्याने सांगली शहरातील रहदारी सुलभ होण्याची अपेक्षा आहे. लवकरच हा पूल वापरासाठी सुरू होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या दौऱ्यात माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, गजानन आलदर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, प्रवीण पाटील, शंकर पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव चव्हाण, भरत बर्गे, हरीश पाटील, रवी बाबर, हर्षल फल्ले, नंदकुमार वाडकर यांच्यासह विविध पदाधिकारी, सांगलीवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.