yuva MAharashtra राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेकडून गोवा बनावटीच्या मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क कुडाळ शाखेकडून गोवा बनावटीच्या मद्य जप्त


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ जून २०२५

दि ०१/०६/२०२५ रोजी मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदशानाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ व स्टॉफ असे सर्व जण मिळून मिळालेल्या खात्रीशीर बातमी नुसार खाजगी वाहनाने गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर, पहाटे ३.०० वाजता थांबून दारुबंदी कायद्रद्याअंतर्गत वाहनांची तपासणी करित असताना, मारुती सुझुकी कंपनीची राखाडी रंगाची स्विफ्ट कार क्र. एम एच ०२ डि एस ५६०७ हि तपासणी करिता थांबवली असता त्यामध्ये गोवा राज्यात विक्री करिता निर्मित केलेला परंतु महाराष्ट्र राज्यात विक्री करिता प्रतिबंधित केलेला गोवा बनावटी मद्याचे विविध बँडचे मद्द्याने भरलेले बॉक्स मिळून आले. 


सदर मुद्देमालाची वाहनासहित एकूण मुद्देमाल किंमत रु ५,१०,८०० /- एवढी असून वाहन चालक सुजल सचिन पवार, वय वर्ष २१ रा. तेरसे बांबर्डे गोसावीवाडी ता कुडाळ जि सिंधुदुर्ग यास वाहनासहित ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई श्री. मनोज शेवरे अधीक्षक सो यांच्या मार्गदशनाखाली श्री. एम एच गरुड निरीक्षक कुडाळ यांच्या समवेत दुय्यम निरीक्षक श्री. यु एस थोरात, दुय्यम निरीक्षक श्रीमती. ए ए वंजारी, सहायक दुय्यम निरीक्षक श्री. एस एस चौधरी, जवान श्री. एन पी राणे, जवान श्री. पी ए खटाटे, जवान नि वाहन चालक श्री. एस एम कदम जवान, श्री. एस आर महेकर यांनी केली.

पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. यु एस थोरात राज्य उत्पादन शुल्क कुडाळ क्र ०२ करत आहेत.