| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २४ जून २०२५
आज भाजप किसन मोर्चा उपअध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या पुढाकाराने तिन्ही शहरातील उद्योजक, व्यापारी संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. विविध संघटनेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. विराज कोकणे मिरज व्यापारी संघटना, माधव कुलकर्णी मिरज औद्योगिक वसाहत, सचिन पाटील उपअध्यक्ष वसंतदादा औद्योगिक वसाहत सांगली, समीर शहा अध्यक्ष सांगली मिरज कुपवाड महापालिका व्यापारी संघटना, कोकितकर अध्यक्ष क्रीडाई, जयराज सगरे माजी अध्यक्ष क्रीडाई यांनी आपले मते या वेळी नोंदविली.
मनपा क्षेत्रात व्यापार व्यवसाय व उद्योग वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच इन्फ्रास्ट्रक्चर देखील उपलब्ध करून देणे आवश्यक आहे प्रामुख्याने शहरांमध्ये प्रवेश करणारे रस्ते चांगले स्थिती करणे आवश्यक आहे अशा मागण्या यावेळी करण्यात आले शहरातील फेरीवाला धोरण चांगल्या पद्धतीने नियोजित करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना यावेळी करण्यात आल्या.
पृथ्वीराज पवार उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजप यांनी यावेळी शहरातील विविध समस्या बाबत मा. आयुक्त यांना माहिती देऊन शहरांमध्ये प्रवेश करणारे रस्ते चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे, शहरांमध्ये येणारे विविध भागातील नागरिकांना नवकल्पना म्हणून धर्मशाळा बांधणे, मनपा क्षेत्रातील विविध ऐतिहासिक इमारती ठिकाणे विकसित करून पर्यटनास चालना देणे, आमराईसारख्या भागामध्ये कमर्शियल फार्मिंग करून विविध आर्थिक उत्पन्न व उपलब्ध करून देणाऱ्या शेतीचा विचार करणे आवश्यक आहे.
महापालिका क्षेत्रातील असलेले नाट्यगृह चांगल्या प्रकारे विकसित करून व्यापार व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे या संदर्भामध्ये माहिती उपलब्ध करून दिली.
मा. आयुक्त सत्यम गांधी यांनी या सर्व बाबीवर महापालिकेत स्तरावर सध्या नियोजन चालू असून येणाऱ्या काळात फेरीवाला धोरण प्रवाह होणे राबवल्या जाणार आहे, तसेच अतिक्रमणमुक्त फुटपाथ करून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच शहरातील व्यवसाय धारकांनी मनपाचे लायसन उपलब्ध करून घ्यावे, आपला व्यवसाय कायदेशीर स्वरूपाचा करावा, असे आव्हान देखील यावेळी करण्यात आले. शहराचे विकासासाठी आपल्या संघटनेने सहकार्य करावे येणाऱ्या काळात मनपा क्षेत्रात विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी नवसंकल्पना देऊन सहकार्य करावे व सहभाग देखील नोंदवावा असे आव्हान मा. आयुक्त यांनी यावेळी केले.
व्यापारी उद्योजक व सर्व संघटना यांच्या बाबत कोणती अडचण निर्माण होऊ नये यासाठी सिटी प्रमोशन सेल निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी मा. आयुक्त यांनी दिली 500 चौरस मीटर बांधकाम परवाना 30 दिवसात देण्याची तयारी केली आहे, एक जुलैपासून सदरचा आदेश कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. व्यापारी संघटना यांची यापुढे वारंवार बैठक घेतली जाईल व समन्वयाने कामकाज केले जाईल असे यावेळी आश्वासन देण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उप आयुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त विद्या सानप मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद सर्व व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.