| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. २५ जून २०२५
महापालिकेच्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृह येथे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व खोकीधारकांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. खोकी धारकांनी विविध मागण्या यावेळी उपस्थित केला होता. त्यामध्ये प्रामुख्याने २००७ -८ मध्ये काढलेल्या खोकीधारकांना लावलेली थकबाकी माफ करावी, हस्तांतरित कर व स्वच्छता कर कमी करावा, अशा स्वरूपाच्या मागण्या होत्या. तसेच ज्या खोकीधारकांचे पुनर्वसन झाले नाही त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी होती.
खोकीधारक संघटनेचे वतीने गणेश कोडते, भाजप किसन मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी सर्व खोकीधारकाच्या मागण्या सविस्तरपणे मांडल्या.
मा सत्यम गांधी आयुक्त यांनी थकबाकी बाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जात असल्याने, सदरचे प्रकरण शासन स्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या खोकीधारकांचे सद्यस्थितीत खोके जागेवर नाही अशा खोकीधारकांना वारंवार आपली माहिती प्रशासनास देण्या बाबत जाहीर नोटीस देऊनही माहिती दिली नाही, अशा खोकी धारकांना पुन्हा सूचना देण्यात येत आहे की, २००७-०८या कालावधीत आपले खोके काढले आहे, जागेवर नाही अशा खोकीधारकांनी आपले कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जे कोणी देणार नाहीत, त्याच्या खोक्याच्या नंबर रद्द होऊन त्याचे नुकसान होणार आहे. तसे होऊ नये याकरिता सर्व माहिती देणे आवश्यक आहे, असे आवाहन देखील करण्यात आले.
मा आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्व मागण्याबाबत सकारात्मक धोरण घेणार आहे, तथापी खोकीधारकांनी आपली थकबाकी वेळेत भरून प्रशासनास सहकार्य करावे असे नमूद केले आहे. नियोजनबद्ध खोकी पुर्वसन करण्यात येणार आहे. संघटना आणि नव्याने गठित होणारी समितीच्या माध्यमातून करता येईल असे या वेळी नमूद केले.
यावेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त विजया यादव, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद व मनपा क्षेत्रातील सर्व खोकीधारक प्रतिनिधी उपस्थितीत होते.