yuva MAharashtra अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेतर्फे सांगलीत रंगसंगत नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेतर्फे सांगलीत रंगसंगत नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ११ जून २०२५ 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली आयोजित रंगसंगत नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस मुख्य प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम रंगकर्मी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये अतुल पेठे, ओंकार गोवर्धन, प्रदीप वैद्य, अभिजित झुंजारराव इत्यादी उपस्थित राहणार आहेत. दिनांक - ११ ते १५ जून २०२५ या कालावधीत ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. वयोमर्यादा १८ ते ५५ असून वेळ दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० असणार आहे.

ही कार्यशाळा, संजय भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म मीडिया अँड आर्टस्, शिव पॅव्हेलियन, दैनिक सकाळ कार्यालयाच्या वरती, तिसरा मजला, राम मंदिर चौक, सांगली.या ठिकाणी होणार आहे.


शिबीर प्रमुख म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगलीचे प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी हे जबाबदारी सांभाळत आहेत. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील नाट्य चळवळ अधिक सक्षम होण्याकरिता ह्या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगलीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी दिली.