yuva MAharashtra उद्या प्रकाशबापूंच्या जयंतीदिनी कॉंग्रेस सेवादल कार्यकर्त्यांची कार्यशाळा, विविध मान्यवर राहणार उपस्थित

उद्या प्रकाशबापूंच्या जयंतीदिनी कॉंग्रेस सेवादल कार्यकर्त्यांची कार्यशाळा, विविध मान्यवर राहणार उपस्थित


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. २० जून २०२५

21 जून रोजी सांगलीचे माजी खासदार हिंद रत्न प्रकाश बापू पाटील यांच्या जयंती दिनी सकाळी ११ ते 5 या कालावधीमध्ये काँग्रेस सेवा दल कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. काँग्रेस भवन सांगली येथे ही महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी ही माहिती दिली.

येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेसाठी महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे प्रदेश पदाधिकारी, सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते मंडळी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच एक ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्री लालजी देसाई व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष श्री विलास आवताडे व यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप दादा चाकोते यांच्या संमतीने घेण्यात येणार आहे असे ढोले यांनी सांगितले. 


यावेळी स्वागत विठ्ठलराव काळे व शेवटी आभार सचिन पाटील मिरज यांनी मानले. यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी येणाऱ्या सर्व निवडणुकी मध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले पाहिजे, जेणेकरून आपल्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. तसेच येणाऱ्या काळामध्ये सेवा दलाच्या कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरामध्ये तरुण युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे असे सांगितले. यावेळी सौ प्रतीक्षा काळे मीना शिंदे सिद्राय्या गणाचार्य मौलाली वंटमोरे बबन बनसोडे शिवाजी माळी नामदेव पठाडे विश्वास यादव इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते