yuva MAharashtra ऋतुजा राजगेची आत्महत्या नसून हत्याच. ख्रिश्चन धर्मगुरूला सह आरोपी करण्याची हिंदू माजी आमदार नितीन शिंदे यांची मागणी

ऋतुजा राजगेची आत्महत्या नसून हत्याच. ख्रिश्चन धर्मगुरूला सह आरोपी करण्याची हिंदू माजी आमदार नितीन शिंदे यांची मागणी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १३ जून २०२५ 

ऋतुजा सुकुमार राजगे (गौरी उर्फ ऋतुजा चंद्रकांत पाटील) हिने ख्रिश्चन धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर तिच्या गुंडेवाडी येथील आई-वडील आणि भावांचे सांत्वन करून कुटुंबाला आधार देण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्ट मंडळाची भेट घेतली. 


यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, ऋतुजा पाटील व तिच्या आई-वडिलांना राजगे कुटुंबियांनी हिंदू धनगर असल्याचे खोटे सांगून त्यांची फसवणूक केली आहे. ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या सांगण्यावरून तिच्या सासरच्या लोकांनी अनन्वित अत्याचार केले हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे वटसावित्रीची पूजा करायला विरोध केला. गरोदर असताना गर्भाशयातील गर्भावर संस्कार करायच्या नावाखाली बायबल वाचण्याची शक्ती केली. तिने नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली. तिच्या अंगामध्ये सैतान आलाय. अशी खोटी आवई उठवून तिचा छळ करून तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव केला . यातील आरोपी पती सुकुमार राजगे, सासू अलका राजगे, सासरे सुरेश राजगे यांच्याबरोबर ख्रिश्चन धर्म गुरुला ताबडतोब अटक करून सहआरोपी करावे. आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारी वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी मा. आ. नितीन शिंदे यांनी केली.

राज्यात दिवसेंदिवस मातंग, धनगर, माळी, समाजातील गोरगरीब लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारची पैशाचे, नोकरीचे आमिषे दाखवून सदर समाजाचे धर्मांतर सुरू आहे. या धर्मांतर करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरूंच्या पासून या देशाला राज्याला मोठा धोका आहे. राज्यातल्या सरकारनं राज्यात ताबडतोब धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा. जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी भाजप आमदारांनी येत्या अधिवेशनामध्ये या विषयावर आवाज उठवून ऋतुजा च्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. 

यावेळी पै. सुरज मामा पवार, संजय जाधव, अरुण वाघमोडे, प्रसाद रिसवडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, सुमित शिंगे, गजानन मोरे, सोमनाथ गोटखिंडे, गजानन माने, कृष्णा नायडू, प्रकाश कोरे आदी हिंदू एकताचे पदाधिकारी उपस्थित होते.