yuva MAharashtra कुपवाड चैत्रबन नाल्याने घेतला मोकळा श्वास वरील सर्व अडसर दूर केल्याने नाला प्रवाहित

कुपवाड चैत्रबन नाल्याने घेतला मोकळा श्वास वरील सर्व अडसर दूर केल्याने नाला प्रवाहित


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १३ जून २०२५ 

 मा अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ यांनी काल कुपवाड चैत्रबन नाल्याची पाहणी केली. नागरिकांनी नाला प्रवाहित नाही अशी तक्रार केली होती. अति आयुक्त यांनी पाहणी करून नाल्यावरील सर्व अडसर मोकळा करणे बाबत सूचना देऊन अडसर मोकळा केल्याने नाला प्रवाहित झाला.

माजी नगरसेवक विष्णू माने राजेंद्र कुंभार, नागरिक यांनी नाला प्रवाहित करणे कामी सूचना केल्यानुसार जागेवर काम करण्यात आल्याने नाला प्रवाहित झाला. नाल्यावरील अडथळ्याने या परिसरास पावसाळ्यात तलावाचे स्वरुप प्राप्त होत होते. या भागातील नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. अखेर अति आयुक्त रविकांत अडसूळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन नाल्यावरील अडथळे दूर करण्याचे आदेश दिल्यानंतर जेसीबी सहाय्याने अडथळे दूर केल्याने नाला प्रवाहित झाला.


यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, पाणीपुरवठा अभियंता श्री चिदानंद कुरणे, अभियंता महेश मदने, अशोक कुंभार, स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे, विकास कांबळे, गणेश धोत्रे, डॉ रवींद्र ताटे यांच्यासमवेत सहा आयुक्त श्री सचिन सांगावकर उपस्थितीत होते.