yuva MAharashtra ठेकेदाराने वसूल केलेली हमाल मजुरी ताबडतोब द्यावी, अन्यथा राज्यात ठेकेदाराला काम करू देणार नाही - मा. आ. नितीन शिंदे.

ठेकेदाराने वसूल केलेली हमाल मजुरी ताबडतोब द्यावी, अन्यथा राज्यात ठेकेदाराला काम करू देणार नाही - मा. आ. नितीन शिंदे.


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १४ जून २०२५

सांगली आगारामधील पाच भारवाहक (हमाली कामगार) याची गेले सात महिने हमाली मजुरी तीन लाख पन्नासहजार इतकी दिली नाही. हमाली मजुरीचा ठेका पुण्यातील हेनेक्स इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीस एका ब्लॅक लिस्ट कंपनीने घेतलेला असून त्या कंपनीने एसटी मुंबई सेंट्रल ऑफिसमध्ये काम करणाऱ्याच्या नातेवाईकांना सबठेका दिलेला आहे. महाराष्ट्रात भार वाहक हमाल मजूर यांना हमाल मजुरी देण्यात आलेली आहे. परंतु सांगलीच्या सब ठेकेदार राजश्री शिंदे यांनी गेली सात महिने हमाल मजुरी न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आणि याचा फटका प्रवाशांना बसत आहे. 

सदर चालू असलेल्या आंदोलनास एसटी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी पाठिंबा दिला. गेली सात महिने थकलेली हमाल मजुरी सांगली आगारातील भार वाहकांना करावी. अन्यथा महाराष्ट्रातील सर्व डेपोमध्ये काम करणाऱ्या ठेकेदाराचं काम बंद पाडू त्यांना काम करू देणार नाही. असा इशारा एसटी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे. 

   
माजी आमदार नितीन शिंदे आंदोलन स्थळी जाऊन एसटी कष्टकरी जनसंघाचा पाठिंबा देऊन सांगली आगार व्यवस्थापक व सांगली जिल्हा विभागीय नियंत्रक यांच्याशी चर्चा केली या दोघांनीही या हमाल मजुरांचे कष्टाचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा आश्वासन दिले.
    
यावेळी प्रदेश सचिव राजू खैरमोडे, विभागीय सचिव महेश शेळके, आगार अध्यक्ष सुरेश माने, रमेश ढमाळ, हमाल पंचायतचे जनरल सेक्रेटरी विकास मगदूम, उपाध्यक्ष प्रल्हाद व्हनमाने, कल्लाप्पा कांरडे एस.टी.पार्सल हमाल ज्ञानदेव हारगे, प्रकाश डांगे, राजेश जावळे, निलेश जैनावर, शामराव होवाळ, अनिरुद्ध कुंभार, सुमित शिंगे आदी एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.