| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १४ जून २०२५
दि १६ जून २०२५ रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या शाळांना सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व खाते प्रमुख, महानगरपालिकेच्या सर्व खात्यांचे अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन केले आहे.
सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पहिल्या दिवशी म्हणजेच १६ जून रोजी सकाळ सत्रातील शाळांना सकाळच्या वेळेत आणि दुपार सत्रातील शाळांना दुपारच्या वेळेत भेटी देतील. शाळांमध्ये शालेय वर्षाची सुरूवात उत्साहात आणि आनंदात करण्याच्या प्रमुख उद्देशाने ही भेट असेल.
शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली आहेत याचीही खातरजमा करतील. अशी माहिती उप आयुक्त स्मृती पाटील व मनपा प्रा शी मंडळ प्रशासन अधिकारी श्री खेडकर यांनी दिली.
मा सत्यम गांधी आयुक्त यांनी भेटीचा उद्देश स्पष्ट करताना सागितले कीं, शाळेच्या पहिल्या दिवसांपासून मुलांची उपस्थिती वाढविणे तसेच शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी समाज आणि पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन करणे, नवीन शिक्षणिक वर्षाची सुरवात उत्साही वातावरणात आनंददायी हा शाळाभेटीचा प्रमुख उद्देश आहे. शाळेचा पहिला दिवस उत्सव म्हणून साजरा करणे, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे, आणि शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेणे, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा देण्यासाठी काय करता येईल याबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांचे सोबत चर्चा करणे याबरोबरच शाळेतील क्रीडा सुविधांची उपलब्धता आणि वापराचे मार्गदर्शन करणे, तसेच शालेय कामकाज आणि शाळेच्या गुणवत्तेचा आढावा घेणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. शाळेच्या विकासासाठी आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना सुचविल्या जातील, तसेच धोकादायक इमारती व वापरात नसलेली स्वच्छतागृहे अशा अडचणी आढळून आल्यास संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्या करिता नियोजन करता येईल.
एकूणच लोक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची शाळा भेट ही विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक यासर्व घटकांसाठी प्रेरणादायी आणि शैक्षणिक वर्षांच्या सुरवातीला ऊर्जा देणारी ठरेल अशी अपेक्षा आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.