yuva MAharashtra जबरदस्तीने धर्मांतर यापुढे सहन केले जाणार नाही - चित्राताई वाघ

जबरदस्तीने धर्मांतर यापुढे सहन केले जाणार नाही - चित्राताई वाघ


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १४ जून २०२५

सांगलीत नुकत्याच ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरी झालेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या पूजा राजगे यांच्या कुटुंबीयांना चित्राताई वाघ यांनी भेट दिली.
त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने धर्मांतर यापुढे सहन केले जाणार नाही असे विधान केले.


येत्या विधानसभेच्या अधिवेशनात धर्मांतर बंदी कायद्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी या वेळेला सांगितले.
पूजा चे लग्न होताना तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे ही गोष्ट पूजाच्या आई-वडिलांपासून आणि पूजाच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. लग्न झाल्यावर पूजाचा नवरा, सासू आणि सासरा यांनी बळजबरीने तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरून पैशाची ही मागणी केली. पूजाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींना पैसे पण दिले. सांगलीतील खतीब नगर चर्च मधील ख्रिश्चन धर्मगुरू हा सातत्याने तुझ्यावर पुजावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी बळजबरी करत होता. या त्रासाला कंटाळून अखेर सात महिन्याच्या गर्भवती व उच्चशिक्षित अशा पूजा राजगे हिने आत्महत्येचे पाऊल उचलले.



तिला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या तिच्या सर्व सासरच्या मंडळींना व त्या धर्मगुरूला तातडीने अटक करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी चित्राताई वाघ यांनी केली आहे.
याशिवाय कोणत्याही महिलेला जर धर्म बदलासाठी सासरी दबाव येत असेल तर त्या महिलेने तातडीने 112 नंबर वर फोन करून पोलिसांकडे तक्रार करावी, संपूर्ण सरकार त्या महिलेच्या मागे असेल असे आवाहन चित्राताई वाघ यांनी यावेळी केले.


मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणांमध्ये जे जे दोषी आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याची सरकारची भूमिका आहे असे यांनी सांगितले.



यानंतर चित्राताई वाघ यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचीही भेट घेतली व यातील आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी प्रयत्न करावेत व या प्रकरणातला ख्रिश्चन पास्टर याला या गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करून सह आरोपी करावी अशी मागणी केली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, स्वातीताई शिंदे, सविताताई मदने व भाजपाच्या महिला पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.