| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ४ जून २०२५
डोंगरसोनी येथील निवृत्त शिक्षक श्री तात्यासाहेब साळुंखे वय 75 यांना सांगलीत त्यांचा मुलगा डॉक्टर नितीन साळुंखे यांच्या घरी असताना, एक जून 2025 रोजी मेंदूतील अचानक झालेल्या रक्तस्त्रावामुळे सेवा सदन हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले.
रुग्णाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करून झाल्यावर डॉक्टर केतकी पटवर्धन यांनी पेशंट ब्रेन डेथ असून त्यांना अवयव रुपी तुम्ही जिवंत ठेवण्यासाठी अवयव दान करू शकता असा सल्ला, डॉक्टर नितीन साळुंखे आणि कुटुंबीय यांना दिला. त्यानंतर तात्यासाहेब साळुंखे यांच्या पत्नी सुमन साळुंखे तसेच मुले संजय साळुंखे आणि डॉक्टर नितीन साळुंखे यांनी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही अवयव दानाचा मानवतावादी निर्णय घेतला.
यावेळी जनरल प्रॅक्टिस फोरमचे अध्यक्ष डॉ.अनिता पागे , निमा अध्यक्ष डॉ.अमर पागे तसेच डॉ. देवपाल बरगाले या डॉ. नितीन साळुंखे यांच्या मित्रमंडळींनी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर डॉ. हेमा चौधरी यांच्या समन्वयाने अवयव दानाचा निर्णय घेण्यास सहकार्य केले.
सेवा सदन हॉस्पिटल मधील डॉ. मयुरेश दातार, डॉ. केतकी पटवर्धन, डॉ. अमृता दाते यांनी ZTTC, Pune च्या मुख्य कोऑर्डिनेटर आरती गोखले यांना कळवून अवयव दानाचे महान कार्य सफल केले. यावेळी आयसीयु मधील सर्व डॉक्टर स्टाफ तसेच नर्सिंग स्टाफ सचिन, सौरभ, उमर आणि अमृता यांचे काम महत्त्वाचे ठरले.
सेवा सदन हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ रविकांत पाटील, डॉ साक्षी पाटील, डॉ दिपा पाटील या सर्वांचे सहकार्य लाभले.
श्री तात्यासाहेब साळुंखे यांचे यकृत दान यशस्वीरित्या संपन्न झाले आणि ते अवयव एंड स्टेज ऑर्गन फेल्युअर झालेल्या व्यक्तीसाठी जीवनदान देणारे ठरले. तसेच नेत्रदान सुद्धा सफल झाले आणि गरजू अंध व्यक्तींना दृष्टी दान देणारे ठरले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती आणि सद्गती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
डॉक्टर हेमा चौधरी,
सांगली जिल्हा समन्वयक,
दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन