| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २२ जून २०२५
सांगली जिल्ह्याचे माजी खासदार आणि जनतेच्या मनातील ‘हिंदरत्न’ स्व. प्रकाशबापू पाटील यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम पार पडले. कृष्णाकाठी असणाऱ्या त्यांच्या समाधीस्थळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्यास व जीवनास कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिकदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व खासदार विशालदादा पाटील आणि जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी विशेषतः आदरांजली अर्पण केली. तसेच वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयातही श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांना सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी महापौर किशोर शहा, नगरसेवक उत्तम साखळकर, माजी नगरसेवक राजेश नाईक, करीमभाई मेस्त्री, संतोष पाटील, संजय कांबळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सदाशिव खाडे, प्रा. सिकंदर जमादार, पी. एल. रजपूत, सुभाषतात्या खोत, संजय हजारे, अमरसिंह पाटील, सुजयनाना शिंदे, सुरेश शिंदे, संग्रामदादा पाटील, शशिकांत नागे, मन्सुर खतीब, बी. डी. पाटील, सुनिल आवटी, अमितदादा पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रा. विशाल चांदुरकर, दिनकर साळुंखे, प्रल्हाद गडदे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमात साखर कामगार, काँग्रेस सेवादल, विविध सहकारी संस्था, बाजार समिती आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, युवा नेते आणि निष्ठावान कार्यकर्ते यांनीही सहभाग घेतला.
स्व. प्रकाशबापू पाटील यांच्या लोकसंग्रहात्मक कार्यशैलीचे, सर्वसामान्यांसाठी त्यांनी उभारलेल्या विकासकामांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचा निर्धार व्यक्त केला.