आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदल करत ५८ नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये हे बदल घडवून आणले गेले असून, या निवडींना मोठे राजकीय महत्त्व आहे.
पक्षाने काही महिन्यांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. मंत्रिपदाऐवजी पक्ष संघटनेचे काम सांभाळत त्यांनी 'संघटन पर्व' यशस्वीपणे पार पाडले. या अभियानातून दीड कोटी नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली असून, आगामी निवडणुकांसाठी हा टप्पा निर्णायक ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व जिल्ह्यांतील नव्या जिल्हाध्यक्षांची यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. हे पत्रक चैनसुख संचेती यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई अशा प्रमुख भागातील जिल्हाध्यक्षांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी सत्यजित देशमुख यांचा मार्ग मोकळा ठेवत संयम पाळला होता. त्यावेळी पक्ष नेतृत्वाने मोठी जबाबदारी देण्याचा दिलेला शब्द आता पूर्ण होत असल्याचे स्पष्ट दिसते.
सम्राट महाडिक हे नव्या पिढीतील समन्वय साधणारे, कार्यक्षम आणि जनाधार असलेले नेतृत्व मानले जाते. शिराळा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांच्या विजयामागे त्यांचा मोलाचा वाटा होता. वाळवा-शिराळा भागात महाडिक यांचा तरुणांमध्ये विशेष प्रभाव आहे. सदस्य नोंदणी मोहिमेतही त्यांचे कार्य लक्षणीय ठरले होते. त्यामुळेच त्यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड अपेक्षित मानली जात आहे.
भाजपने केलेले हे फेरबदल पक्षाच्या आगामी रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासारख्या महानगरांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणे आणि इतर स्थानिक संस्थांमध्ये विजय मिळवणे, हा पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून, २०२२ च्या राजकीय आरक्षणानुसार पुढील चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे भाजपने घेतलेले हे संघटनात्मक निर्णय अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष पुढील निवडणुकांमध्ये जोमाने उतरेल, असे मानले जात आहे.
नवनिर्वाचित अध्यक्षांची जिल्हानिहाय यादी
कोकण
१) सिंधुदुर्ग -श्री. प्रभाकर सावंत,
2 रत्नागिरी उत्तर - श्री. सतिश मोरे,
3 रत्नागिरी दक्षिण - श्री. राजेश सावंत,
4 रायगड उत्तर - श्री. अविनाश कोळी
5 रायगड दक्षिण - श्री. धैर्यशील पाटील
6 ठाणे शहर - श्री. संदिप लेले
7 ठाणे ग्रामीण - श्री. जितेंद्र डाकी
8 भिवंडी - श्री. रविकांत सावंत
9 मिरा भाईंदर - श्री. दिलीप जैन
10 नवी मुंबई - डॉ. राजेश पाटील
11 कल्याण - श्री. नंदु परब
12 उल्हासनगर - श्री. राजेश वधारिया
प. महाराष्ट्र
13 पुणे शहर - श्री. धिरज घाटे
14 पुणे उत्तर (मावळ) - श्री. प्रदिप कंद
15 पिंपरी चिंचवड शहर - श्री. शत्रुघ्न काटे
16 सोलापूर शहर - श्रीमती रोहिणी तडवळकर
17 सोलापूर पूर्व - श्री. शशिकांत चव्हाण
18 सोलापूर पश्चिम -श्री. चेतनसिंग केदार
19 सातारा - श्री. अतुल भोसले
20 कोल्हापूर पूर्व (मश्री. राजवर्धन निंबाळकर
21 कोल्हापूर पश्चिम - श्री. नाथाजी पाटील
22 सांगली शहर - श्री. प्रकाश ढंग
23 सांगली ग्रामीण - श्री. सम्राट महाडिक
उ. महाराष्ट्र
24 नंदुरबार - श्री. निलेश माळी
25 धुळे शहर - श्री. गजेंद्र अंपाळकर
26 धुळे ग्रामीण - श्री. बापु खलाने
27 मालेगांव - श्री. निलेश कचवे
28 जळगांव शहर - श्री. दिपक सुर्यवंशी
29 जळगावं पूर्व - श्री. चंद्रकांत बाविस्कर
30 जळगावं पश्चिम - श्री. राध्येश्याम चौधरी
31 अहिल्यानगर उत्तर - श्री. नितीन दिनकर
32 अहिल्यानगर दक्षिण - श्री. दिलीप भालसिंग
मराठवाडा
33 नांदेड महानगर - श्री. अमर राजूरकर
34 परभणी महानगर - श्री. शिवाजी भरोसे
35 हिंगोली - श्री. गजानन घुगे
36 जालना महानगर - श्री. भास्करराव दानवे
37 जालना ग्रामीण - श्री. नारायण कुचे
38 छत्रपती संभाजीनगर उत्तर - श्री. सुभाष शिरसाठ
39 छत्रपती संभाजीनगर पश्चिम - श्री. संजय खंबायते
40 धाराशिव - श्री. दत्ता कुलकर्णी
विदर्भ
41 बुलढाणा - श्री. विजयराज शिंदे
42 खामगांव - श्री. सचिन देशमुख
43 अकोला महानगर - श्री. जयवंतराव मसणे
44 अकोला ग्रामीण - श्री. संतोष शिवरकर
45 वाशिम - श्री. पुरुषोत्तम चितलांगे
46 अमरावती शहर - डॉ. नितीन धांडे
47 अमरावती ग्रामीण - श्री. रविराज देशमुख
48 यवतमाळ - श्री. प्रफुल्ल चव्हाण
49 पुसद - श्रीमती डॉ. आरती फुफाटे
50 मेळघाट - श्री. प्रभुदास भिलावेकर