yuva MAharashtra शोलेस्टाईल पत्रकार दिपक चव्हाण यांचे आता नशामुक्त अभियान; मान्यवरांकडून कौतुक !

शोलेस्टाईल पत्रकार दिपक चव्हाण यांचे आता नशामुक्त अभियान; मान्यवरांकडून कौतुक !


फोटो सौजन्य  :  फेसबुक वॉलवरुन 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२५

सांगलीचे महापालिकेचे स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माजी वसुंधरा अभियानाचे ब्रँड ॲम्बेसिडर दीपक चव्हाण यांच्या शोले स्टाईल नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री नाम. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. 

यावेळी नशामुक्ती अभियान सुरु केल्याबद्दल नामदार चंद्रकांतदादानी दीपक चव्हाण यांना कॅडबरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शासनाचा नशामुक्ती अभियान शोले स्टाईल गाडीवरून फिरून लोकांपर्यंत पोहचवण्याचे कामं दीपक चव्हाण करणार आहेत. तसेच चौकाचोकात गावोगावी जातं गाण्याच्या माध्यमातून नशामुक्ती अभियान पोहचवले जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान महापालिकेत सुद्धा आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी शोले स्टाईल गाडीवर बसून नशामुक्ती अभियानाला शुभेच्छा दिल्या.