yuva MAharashtra डॉ जगन्नाथ दीक्षित ४ मे रोजी सांगलीत !

डॉ जगन्नाथ दीक्षित ४ मे रोजी सांगलीत !

फोटो सौजन्य  : Wikimedia 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२५

दीक्षित जीवनशैलीच्या लाभार्थ्यांशी आणि डॉ दीक्षित जीवनशैली अंगीकारणाऱ्या सदस्यांसाठी,  व सर्व आरोग्य प्रेमी नागरिकांसाठी मधुमेह मुक्ती व वजन कमी सोप्या पद्धतीने कसे करावे, हे मार्गदर्शन करण्यासाठी दीक्षित जीवनशैलीचे प्रणेते ,आणि सुप्रसिद्ध आहार व जीवनशैली तज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित सर ४ मे रविवार संध्याकाळी ५ वाजता सांगलीत येत आहेत. 

त्यांच्या मार्गदर्शनाचे व्याख्यान आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा , हितगुज असा स्वरूपाचा कार्यक्रम  रविवार 4 मे संध्याकाळी पाच वाजता दांडेकर हॉल एसटी कॉलनी विश्रामबाग सांगली येथे आहे. प्रवेश सर्वांना खुला आहे. . तसेच या निमित्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी सवलतीच्या दरात  200 मध्ये HbA1c रक्त तपासणी केली जाणार आहे याचाही लाभ घ्यावा तरी डॉ दीक्षित सरांचे व्याख्यान ऐकण्यासाठी, सर्वांनी यावे असे आवाहन डॉ दीक्षित जीवनशैली मधुमेह मुक्ती केंद्र, DRC तर्फे श्रीरंग केळकर, चिंतामणी बोडस, भावना शहा प्रतिभा पाटील  माधुरी दांडेकर यांनी केले आहे.