yuva MAharashtra महावितरण सांगली मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून अमित बोकील यांची नियुक्ती

महावितरण सांगली मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून अमित बोकील यांची नियुक्ती


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ मे २०२५

महावितरणच्या सांगली विभागात अधीक्षक अभियंता म्हणून अमित बोकील यांनी अलीकडेच कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले धर्मराज पेटकर यांची बारामती येथे मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.

अमित बोकील यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2004 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात (एमएसईबी) कनिष्ठ अभियंता म्हणून केली. त्यानंतर त्यांनी सरळ सेवा व पदोन्नतीद्वारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अखेर अधीक्षक अभियंता अशी यशस्वी वाटचाल केली आहे.


त्यांच्या सेवाकाळात सांगली, कोल्हापूर, कराड, वाई आणि मुंबई या विविध ठिकाणी त्यांनी प्रभावीपणे काम केले असून, त्यांना वीज क्षेत्रातील दोन दशके अनुभव आहे.

कार्यभार स्वीकारताना बोकील यांनी सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा आणि वीज सुरक्षेला अग्रक्रम देत मूलभूत वीज यंत्रणा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.