| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ मे २०२५
सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने मे महिन्याच्या शेवटचा रविवार दिनांक 25 रोजी काँग्रेस भवन सांगली येथे 'रविमिलन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस सेवा दलाचे कार्य अत्यंत चांगले पद्धतीने चालू असून नुकतेच तिरंगा यात्रेमध्ये माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांनी सेवा दलाचे अभिनंदन केले आहे. याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये काँग्रेस सेवा दलाने प्रत्येक कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडावे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेस सेवा दलाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करून नवीन युवकांना काँग्रेस व काँग्रेस सेवा दला बद्दल माहिती देऊन वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिराबद्दल गोडी निर्माण होण्याचे करिता प्रयत्न करणार आहोत, यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'रविमिलन' कार्यक्रम आयोजित करून मागील महिन्यातील कार्यक्रमांचा आढावा आणि पुढील महिन्यातील कार्यक्रमाचे नियोजन याबाबतचा लेखाजोखा मांडण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष अरुण पळसुले केले, शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मानले यावेळी नामदेव पठाडे, सुनीता मदने, सुनीता चौगुले, मौलाली वंटमोरे, सुरेश गायकवाड, गणेश वाघमारे, कुपवाडचे गणाचार्य राजाराम गवळी, हरीश पुजारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.