yuva MAharashtra प्रशासन संभाव्य पूर आपत्ती काळामध्ये तोंड देण्यास प्रशासन तयार - आयुक्त सत्यम गांधी

प्रशासन संभाव्य पूर आपत्ती काळामध्ये तोंड देण्यास प्रशासन तयार - आयुक्त सत्यम गांधी

  

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ मे २०२५

आज मा.आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली परिसर मिरज संभाव्य पूर परिस्थिती बाबत समक्ष सर्व अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली. सांगलीमधील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, कर्नाळ बायपास रोड तसेच पूर बाधित होणाऱ्या कुटुंबियांना स्थलांतरीत करण्यात येणाऱ्या निवारा केंद्रा बाबत व्यवस्था पाहणी केली.

सांगली येथील भिडे जलतरण रोटरी क्लब, शाळा नंबर 17, रोटरी क्लब विश्रामबाग इत्यादी भागाची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना आयुक्तांनी संभाव्य पूर परिस्थिती उपयोजनेबाबत सूचना केल्या.


मिरज येथील कृष्णा घाट परिसर, मिरज हायस्कूल इत्यादी परिसराची पाहणी करून कृष्णा घाट परिसरातील पुराने विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी करावे लागणारे उपाय योजनांबाबत चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली.


यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सहदेव कावडे, नकुल जकाते, सचिन सागावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुरणे, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद, डॉ रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी सुनील माळी इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.