| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ मे २०२५
कर्मवीर पतसंस्थेचे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्या वतीने दिला जाणारा कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार देवून महाराष्ट्र दिनादिवशी गौरविण्यात आले. त्याबद्दल डॉ. नरेंद खाडे यांचा कर्मवीर पतसंस्थेच्या संचालक मंडळ सभेत चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांच्याहस्ते सत्कार करणेत आला.
डॉ. नरेंद्र खाडे यांचे सामाजिक, वैद्यकीय व सहकार क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डॉ. नरेंद्र खाडे यांनी कवठे एकंद येथे सिध्दनाथ पाणीपुरवठा संस्थेचे मुख्य प्रवर्तक व चेअरमन म्हणून उल्लेखनिय कार्य केले आहे. शालेय मुलांची मोफत आरोग्य तपासणी, शासकीय सेवकां ची मोफत आरोग्य तपासणी आणि गरजुना मोफत आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी चांगले कार्य केले आहे. डॉ. खाडे यांनी अजितनाथ व शांतीनाथ जिनमंदिर चे अध्यक्षपद, वसंतदादा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतदादा पाटील टेक्नोलॉजी इन्स्टीट्युट चे अध्यक्षपद तसेच कर्मवीर पतसंस्थेचे १९९३ पासून संचालक तसेच चेअरमन म्हणुन देखील काम पाहिले आहे. यापुर्वी त्यांना धन्वतंरी व समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. सत्कारास उत्तर देताना डॉ. नरेंद्र खाडे यांनी समाज सेवेत आपला वेळ व्यतीत करण्याची भावना व्यक्त केली. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय व शेती या सह सामाजिक कार्यात सहभागी होवून अविरत चालत आलेली रुग्ण सेवा पुढे चालू ठेवून आयुष्याची वाटचाल करणे यात समाधान असल्याचे बोलून दाखविले..
यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, अॅड. एस.पी. मगदुम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, ओ. के. चौगुले (नाना) श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम व सेवक वर्ग उपस्थित होते.