yuva MAharashtra मिरज एम. आय. डी. सी. मध्ये तरुणाचा मध्यरात्री खून; मारेकरी पसार !

मिरज एम. आय. डी. सी. मध्ये तरुणाचा मध्यरात्री खून; मारेकरी पसार !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २६ मे २०२५

मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च कंपनीच्या मागील शिवशक्तीनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने भोसकून एका तरुणाचा जीव घेतला. श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय 29, रा. भोसे, ता. मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव असून, हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांची टीम तपासासाठी सक्रिय झाली आहे.


मिरज व कुपवाड एमआयडीसी परिसरात अनेक परप्रांतीय कामगार रोजगारासाठी कार्यरत आहेत. यापूर्वी अशा गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर, चौगुले यांच्या हत्येमागे परप्रांतीय मजुरांचा हात आहे की इतर काही वैयक्तिक अथवा व्यावसायिक कारण, हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.