| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ मे २०२५
सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक डॉक्टर नारायण सुब्बाराव हर्डीकर यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अजित शिरगावकर यांनी काँग्रेस सेवा दल हे काँग्रेसचा मूळ पाया असून काँग्रेसचे पूर्ण जबाबदारी काँग्रेस सेवा दलावर आहे. सेवा दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनुशासन, निष्ठा आणि समर्पण ही वृत्ती असल्यामुळेच काँग्रेसला, काँग्रेस सेवा दलामुळेच गत वैभव प्राप्त होईल, असे उद्गगार काढले.
प्रारंभी डॉक्टर नारायण सुभाराव हर्डीकर यांच्या प्रतिमेस अजित शिरगावकर व कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी स्वागत प्रास्ताविक शहर जिल्हा सचिव मौला वंटमोरे यांनी केले तर शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मांडले.
यावेळी अनिल मोहिते यांनी बोलताना डॉक्टर नारायण सुब्बाराव हर्डीकर यांच्या जीवन चरित्राविषयी सखोल अशी माहिती देऊन, सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला बळकट करण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी पैगंबर शेख यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीमध्ये सेवा दलाला विश्वासात घेऊन त्यांच्या कार्यकर्त्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. अजित ढोले यांनी सेवा दल व डॉ नारायण सुब्बाराव हर्डीकर त्याच्या कार्याबद्दल व आगामी काळामध्ये सेवा दलाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासंदर्भात उपस्थित त्यांना माहिती देऊन, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा पातळीवरील 200 कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येईल, त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित करांडे, रमेश रासकर, जतचे अध्यक्ष मोहन माने पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे, मिरज तालुका अध्यक्ष गुलाबराव भोसले, विक्रम सिंह उर्फ राजू पाटील, सुरेश पाटील कवलापूर, अपंग सेलचे सुरेश गायकवाड, नामदेव पठाडे, मीना शिंदे, यशवंत दिंडे, मुफित कोळेकर, खुदबुदीन मुजावर, मिरज सेवा दलाचे राजीव वांडरे, गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.