| सांगली समाचार वृत्त |
कुंडल - दि. ८ मे २०२५
कुंडल (ता. पलूस) येथील जैन समाजाच्या देवी देवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक ९ रोजी मुक मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची व श्री. १००८ कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर व जैन मंदीर सिद्ध अतिशय क्षेत्र ट्रस्ट व कुंडल व श्री. १००८ तिर्थराज नवग्रह न दिगंबर जैन मंदीर ट्रस्ट कुंडल, सकल - जैन समाज कुंडल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
२७ एप्रिल रोजी पश्चिम - महाराष्ट्रातील समस्त जैन समाजाचे . श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. सिद्धातिशय क्षेत्र, कुंडल येथील पहाडस्थित श्री गिरी पार्श्वनाथ मंदिरातील भ. पार्श्वनाथ आणि माता पद्मावती देवीच्या मूर्तीची काही विकृत मनोवृत्तीच्या समाज कंटकानी विटंबना केली. या प्रकारामुळे संपूर्ण जैन समाज दुखावला असून अशा अपप्रवृत्तीचा निषेध व्यक्त करत आहे. श्री सिद्धातिशय क्षेत्र, कुंडल हे जैन परंपरेतील अत्यंत प्रचिन श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भगवान महावीर यांचे समवशरण आले असून, याच ठिकाणावरून भगवंतांची दिव्य वाणी प्रसारित झाली होती अशी मान्यता आहे. म्हणून कुंडल हे सिद्धक्षेत्र आहे.
या ठिकाणी श्रीधर केवली यांची समाधी आहे. या ठिकाणी अनेक अतिशय घडल्याने हे अतिशय क्षेत्र म्हणून ही मान्यता प्राप्त आहे. कुंडल येथील जैन मंदिर हे अति प्रचिन मंदिर आहे. या गिरी पार्श्वनाथ मंदीरातील भ. पार्श्वनाथांची मूर्ती ही सुमारे ३००० हजार वर्षे पासून या ठिकाणी विराजमान आहे. अशा पवित्र जैन मंदिरातील मूर्तीची अज्ञात माथेफिरूनी विटंबना करून संपूर्ण जैन समाजाच्या श्रद्धेवर आघात केला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ म्हणून शुक्रवार दि.९ रोजी प.पू. लक्ष्मीसेन व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान कोल्हापुर व नांदणी चे अधिपत्याखाली पंचक्रोशीतील सर्व सकल जैन समाज, कुंडलचे ग्रामस्थ, श्री कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन सिध्दातीशय क्षेत्र कुंडल जि. सांगली, श्री. १००८ तीर्थराज नवग्रह जिनमंदिर झरि पायथा कुंडल, दक्षिण भारत जैन सभा, दक्षिण भारत महिला परिषद, दक्षिण भारत समन्वय समिती, भारतवर्षीय तीर्थक्षेत्र कमेटी महाराष्ट्र आँचल, वीरसेवा दल मध्यवर्ती शाखा सांगली, श्री. सन्मती सेवा दल अकलुज, सन्मती संस्कार मंच सांगली, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था सांगली, सातारा, कोल्हापुर, सह बेळगाव या संस्थानसह सकल जैन समाजाच्या वतीने कुंडल ग्रामपंचायत येथून निषेध मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. व कुंडल ग्रामपंचायत येथे जाहीर सभा होणार आहे या मोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जैन समाज जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची आव्हान शेवटी श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदीर सिद्ध अतिशय क्षेत्र ट्रस्ट कुंडल व श्री. १००८ तिर्थराज नवग्रह दिगंबर जैन मंदीर ट्रस्ट कुंडल, सकल जैन समाज कुंडल यांनी केले आहे.