yuva MAharashtra सांगली जिल्हा पोलिस दलातील ६ कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मानचिन्ह !

सांगली जिल्हा पोलिस दलातील ६ कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मानचिन्ह !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ एप्रिल २०२५

जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. मोटार परिवहन विभागातील सहायक फौजदार राजेंद्र पवार यांना अपघात न करता, २० वर्षाची कारकिर्द उत्तम ठेवल्याबद्दल सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार अनिल कोळेकर यांनी म्हैसाळ येथील हत्याकांड प्रकरणातील तपासात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

सेवेत १५ वर्षे उत्तम रेकॉर्ड ठेवल्याबद्दल इस्लामपूर ठाण्याचे हवालदार दिपक ठोंबरे, मिरज ग्रामीणचे हवालदार शामकुमार साळुंखे, विटा पोलिस ठाण्याचे हवालदार आनंदराव पाटील यांच्यासह पोलिस मुख्यालयातील राष्ट्रीय खेळाडू विकी जांगळे या सहाजणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.


राज्य पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महांसचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी अशा ८०० जणांना सन्मानचिन्ह जाहीर केले. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी अभिनंदन केले. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी सहा कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे.