| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ एप्रिल २०२५
विटा येथे ३० किलो एम डी ड्रग्जसापडल्याची घटना घडली. त्याच्या आठवडाभरच आधी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. अमली पदार्थाची तस्करी हे नवे आव्हान घेऊन ना. चंद्रकांतदादा पाटील यांची इनिंग सुरू झाली. भावी पिढी यातून सुरक्षित ठेवायची असेल तर जिल्हा अमलीपदार्थ मुक्त करण्याची गरज ना. पाटील यांनी वेळीच ओळखली. वेळीच पावले उचलत त्यांनी दुसऱ्याच दौऱ्यात अमली पदार्थमुक्तीमध्ये सांगली जिल्ह्याचे आदर्श मॉडेल राज्यात उभे करण्याच्या दृष्टीने संकल्प व्यक्त केला. त्यातून जवळपास दर आठवड्याला आढावाबैठका घेतल्या.
पोलीस विभागाची सतर्कता आणि अन्य यंत्रणांनी प्रबोधन व अन्य बाबतीतदिलेली साथ यामुळे गेल्या महिनाभरात जिल्ह्यात अमली पदार्थसंबंधी एकही घटना घडली नाही. हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी सदैव सतर्कता बाळगली तर भावी पिढी अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचू शकणार आहे आणि हे एक मोठेसामाजिक यश ठरेल, यात शंकाच नाही. अमलीपदार्थमुक्त जिल्हा हा केवळ संकल्पकरून पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील शांत बसले नाहीत. वेळोवेळी आढावा बैठका घेऊन या संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेली पावले यशाच्या पथावर असल्याचे दिसून येते.
आपल्या देशात अमली पदार्थ बाळगणं, त्याचं सेवन करणं हा गुन्हा आहे.अमली पदार्थांची खरेदी व तस्करी हा गंभीर गुन्हा आहे. असं असलं तरीही अमली पदार्थांचं सेवन तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे. ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली असून, अमली पदार्थांच्या सेवनामुळे मानसिक आजार होतात. कुटुंबातील एका सदस्याला नशेखोरीच व्यसन लागलं तर त्याचा त्रास इतरांनाही होतो. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांना अमली पदार्थांपासून रोखण्याची चिंता आहे.
नशेमध्ये अडकलेल्या लोकांचे जीवन वाचवणं, जागरूकता करणे आणि सकारात्मक दृष्टीने पोलिसी खाक्या दाखवणं अशा सर्व तऱ्हेने प्रयत्नांची गरज आहे. याबाबत प्रत्येक बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित सर्व यंत्रणांशी सविस्तर चर्चा करत आढावा घेतला. एवढेच नव्हे गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळण्यासाठी न्यायालयात मजबूत पुराव्यांसह कागदपत्रे सादर करा, हेही त्यांनी वेळोवेळी सूचित केले. अमलीपदार्थ सदराखाली जानेवारी महिन्यात पोलीस विभागाने टाकलेल्या धाडीत १४ किलो ३६६ ग्रॅम गांजा आणि १४ किलो ८०६ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) अशादोन घटना उघडकीस आल्या होत्या.
हा जप्त माल२९ कोटी ६२ लाख ६३ हजार ६६० रूपयांचा होता. या घटनांमध्ये दोन गुन्हे दाखल झाले असून ५ आरोपी कारागृहात बंद आहेत. फेब्रुवारी महिन्यात १६ किलो ८५६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. तर ८९० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. या जप्त मालाचीएकूण किंमत २ लाख ४६ हजार ५६० रूपये होती.
या प्रकरणी एकूण ४ गुन्हे दाखल असून ९ आरोपी अटकेत आहेत. मार्च महिन्यात १० लाख ६५ हजार १२० रूपये किमतीचा ३६ किलो ५०४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात येऊन ७ गुन्ह्यांमध्ये १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट १९८५ (एन. डी. पी. एस.) च्या कलमांखाली या कारवाया करण्यात आल्या. याचबरोबर जप्त मालाची विल्हेवाट लावण्याच्यादृष्टीने पोलीस विभागाने १९८४ पासून २०२४ पर्यंत दाखल वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधील १७ गुन्ह्यातील ८१३ किलो २३२ ग्राम गांजा, ब्राऊन शुगर, कोकन हे एप्रिल महिन्यात मा.न्यायालयाची परवानगी घेऊन जाळले आहे.
या पोलिसी कारवायांसह जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेतलेल्या अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधन स्पर्धांच्या माध्यमातून जनजागर सुरू करण्यात आला. बंद कारखाने व अवैध धंद्यांच्याअनुषंगाने औद्योगिक वसाहती तपासण्यात आल्या. पालकमंत्र्यांकडून मिळणाऱ्या बक्षिसामुळे खबऱ्यांचे जाळे मजबूत झाले. या सर्वांचा सकारात्मकपरिणाम म्हणजे एप्रिल महिन्यात आजपर्यंत अमली पदार्थ संबंधी एकही घटना दाखल झाली नाही. नशा करणं वाईटच हा संस्कार विद्यार्थीव युवकांपर्यंत रूजवावा, यासाठी पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्राधान्य दिले आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात अमलीपदार्थ विरोधी प्रतिज्ञा व प्रबोधनगीत परिपाठावेळी पठण करण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. अगदी पहिल्या बैठकीपासून अमली पदार्थमुक्तीमध्ये सांगली जिल्ह्याचे आदर्श मॉडेल राज्यात उभे करायचे यावर ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भर दिला. अमलीपदार्थतस्करांना या जिल्ह्यात व्यवसायकरणे फायद्याचे नाही, त्यांनी गाशा गुंडाळून जिल्ह्यातून निघून जावे, यासाठी संबंधित सर्व विभागप्रमुखांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी वेळोवेळी दिल्या. प्रत्येक बैठकीत खबऱ्यांसाठी १० हजार रूपयांचे बक्षीस आणि अधिकाऱ्यांना कॅडबरी देऊन वेळोवेळी प्रोत्साहन दिले. एवढेच न थांबता नशेखोरीकरणाऱ्यांना त्यातून बाहेर आणण्यासाठी समुपदेशन, चिकित्सा व उपचार केंद्र सुरू करण्याचे सूचित करून त्यांनी नशेखोरीची समस्या समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने विचार केल्याचे दिसून येते.
ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून त्यांना या जिल्ह्यात धंदाकरणे मुश्किल करून टाका, अशी कडक भूमिका त्यांनी घेतली. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित सर्व यंत्रणांनी साथ दिली. त्यामुळे एक मोठ्या सामाजिकसमस्या जिल्ह्यापुरती रोखण्यात यश आल्याचे दिसून येते. अमली पदार्थतस्करांचे जाळे भेदण्यासाठी अशी मोहीम हाती घेण्याची भूमिका घेणे हेही धाडसाचे आहे. ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने एकूणच अमली पदार्थाच्या समस्येची सर्व बाजूंनी नाकाबंदी करून एक चांगले प्रतिमानस्थापित करण्याकडे वाटचाल सुरू आहे, त्याला सांगलीकर म्हणून आमच्या शुभेच्छा!
केदार खाडीलकर, सांगली.