| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ एप्रिल २०२५
सांगली आणि मिरज व कुपवाड येथील मनपाच्या कार्यालयास आयुक्त सत्यम गांधी यांनी भेटी दिल्या. प्रभाग समिती क्र २ विश्रामबाग, प्रभाग समिती क्र ३ कुपवाड आणि प्रभाग समिती क्र ४ विभागीय कार्यालय मनपा या मध्ये समावेश होता.
काही अधिकारी उपस्थितीत नव्हते, त्या बाबत उप आयुक्त विजया यादव यांना त्यांच्या गैरहजेरी बाबत खुलासा घेण्याची सूचना केली. विभागीय कार्यालयामध्ये अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्या बाबत नियमितता असली पाहिजे याकडे लक्ष देण्याबाबत सूचित केले आहे.
स्वच्छता निरीक्षक दुपार नंतर उपस्थितीत नसतात त्या बाबत आरोग्यधिकारी यांनी नोंद घ्यावी, नागरिकांचा तक्रारीवर कार्यवाही झाली पाहिजे या कामी कोणतीही हयगय अगर कसूर सहन केली जाणार नाही असे स्पष्ट सूचना दिल्या. सहा आयुक्त यांनी अधिकारी याची उपस्थिती बाबत नोंद ठेवावी. आपला अहवाल सादर करणे आवश्यक आहे, असा सूचना दिल्या आहेत.
आज मिरज कार्यालयात जन्ममृत्यू विभागामध्ये जन्म मृत्यूचे दाखले घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. त्याबाबत मा आयुक्त यांनी दखल घेऊन आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून देणे व संगणक उपलब्ध करून देणे बाबत सूचना सबधितांना दिल्या. सदरचे कार्यालय नागरिकाच्या सोयीचे होईल अशा ठिकाणी स्थळंतरीत करण्या बाबत देखील सूचित केले आहे.
कर विभागकडील कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामातील अडचणी समजून घेतल्या. या वेळी उप आयुक्त विजया यादव, सहा आयुक्त डॉ प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला अन्य अधिकारी उपस्थित होते.