yuva MAharashtra सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर यांचा सांगली जिल्हा दौरा : विक्रम सावंत यांचे आवाहन !

सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर यांचा सांगली जिल्हा दौरा : विक्रम सावंत यांचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ एप्रिल २०२५

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खासदार मल्लिकार्जुन खर्गे व देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर हे सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सदरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक ब्लॉक तालुका दौरा 13 एप्रिल ते 16 एप्रिल 2025 यादरम्यान होणार असून त्यांच्या समवेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष खजिनदार सरचिटणीस जिल्हा पदाधिकारी सर्व फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर दौऱ्यामध्ये काँग्रेस पक्षाचे आढावा बैठक व संघटन बांधणीसाठी प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत  


तरी सदरच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रम दादा सावंत यांनी केले आहे.