yuva MAharashtra जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला "चला जाणूया नदीला" मोहिमेचा आढावा !

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला "चला जाणूया नदीला" मोहिमेचा आढावा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ एप्रिल २०२५

'चला जाणूया नदीला' या पर्यावरण संवर्धन मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हास्तरीय विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, नदी समन्वयक व नोडल अधिकारी सहभागी झाले होते.

बैठकीस उपवनसंरक्षक नीता कट्टे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग, पर्यावरण अभ्यासक डॉ. रविंद्र व्होरा, सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अ. वि. हरूगडे, तसेच प्रकाश पाटील, डॉ. मनोज पाटील आणि श्री. घोंगडे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नदी ही आपल्या जीवनाची शुद्ध श्वास आहे, त्यामुळे तिचे आरोग्य, स्वच्छता आणि जैविक समतोल टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. कोणतीही निसर्गहानी होऊ न देता, ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.


उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी मोहिमेत झालेल्या कार्यांची माहिती देताना, विविध टप्प्यांतील अंमलबजावणीचा आढावा मांडला. नदी समन्वयक व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील कामाचा सविस्तर अहवाल लवकरच सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान उपस्थितांनी नद्यांचे रूपांतर ‘अमृतवाहिन्यां’मध्ये करण्यासाठी नवकल्पना व उपाय सुचवले.