yuva MAharashtra राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठक संपन्न !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठक संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ एप्रिल २०२५

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष मा.जयंतरावजी पाटील यांच्या सूचनेनुसार आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी संघटना बांधणी मजबूत करण्यासाठी सांगली शहरजिल्ह्याची बैठक घेण्यात आली.

यावेळी सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहराचा आढावा घेत मा. संजयजी बजाज यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संघटना बांधणी करून निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाण्याचे आदेश दिले तसेच लवकरच प्रभागनिहाय बैठका आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.


यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, मिरज अध्यक्ष अभिजित हारगे, धनपाल खोत, कुपवाड शहराध्यक्ष तानाजी गडदे, हरिदास पाटील उत्तम कांबळे, समीर कुपवाडे, ज्योती अदाटे, महालिंग हेगडे, युवराज गायकवाड, चंद्रकांत हुलवान, अर्जुन कांबळे, विनायक हेगडे, शितल खाडे, फिरोज मुल्ला ,संगिता जाधव, अमृता चोपडे, विनायक हेगडे, अभिजित रांजणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.