yuva MAharashtra शामरावनगर सांगली, वॉर्ड क्रमांक १८ मधील नागरिकांना प्रशासनाच्या विशेष सूचना !

शामरावनगर सांगली, वॉर्ड क्रमांक १८ मधील नागरिकांना प्रशासनाच्या विशेष सूचना !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जानेवारी २०२५

नागरिकांनी घाबरून न जाता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेचे पालन करावे. आरोग्याची काळजी घ्यावी - शुभम गुप्ता


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील जहीर मोहल्ला, मदरसा मशीद, शामरावनगर सांगली, वॉर्ड क्रमांक १८ या भागात पाणी पुरवठा करणारी लाईन लिकेज झाल्याने दूषित पाणीपुरवठा होऊन उलटी व हगवण या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. 

या करिता खबरदारीचे उपाय म्हणून महापालिका आरोग्य विभागाकडून या भागात ५ वैदयकीय टिम तयार करण्यात आल्या असून यांच्यामार्फत या भागात घरोघरी जाऊन हगवण, उलटी व इतर तक्रारीच्या आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहेत. त्याच बरोबर मदरसा मशीद येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रुग्णांवर योग्य तो उपचार करण्यात येत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाकडून लिकेज शोधण्याचे काम सुरु आहे. तरी भागात नागरीकांना उलटी हगवण या सारख्या तक्रारी असल्यास मदरसा मशीद येथे आरोग्य शिबिर व हनुमाननगर प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा तसेच नागरिकांनी घाबरून न जाता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेचे पालन करावे.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील जहीर मोहल्ला, मदरसा मशीद, शामरावनगर सांगली, वॉर्ड क्रमांक १८ या भागात पाईप लाईन लिकेजमुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याने उलटी व हगवण या आजाराचे रुग्ण आढळून येत असून, या भागातील नागरिकांनी पुढे दिलेल्या सूचनेचे पालन करावे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी :-

१) पाणी गाळून उकळून प्यावे.

२) उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये.

३) शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत, ताजेगरम अन्न आहारात घ्यावे.

४) जलसंजिवनी, तरल पदार्थ आहारात घ्यावेत.

५) फळे, इतर फळ भाज्या, खाद्यपदार्थ खाण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुऊन खावेत.

६) शौचास जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.

कोणतीही शारीरिक तक्रार जाणविल्यास (मळगळ, भूक न लागणे, उलटी, जुलाब इत्यादी) आरोग्य केंद्र क्रमांक ४, किंवा इतर महापालिका दवाखाने, आरोग्य केंद्र, आयुष्यमान आरोग्यमंदिर मधील वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घ्यावा. तसेच मदरसा मशीद शामरावनगर सांगली येथे वैद्यकीय शिबीराचे आयोजित करण्यात आले असून, काही तक्रार असल्यास त्यांच्याशी ही संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकिय अरोग्याधिकारी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका यांच्यावतीने करण्यात येत आहे.

डॉ. वैभव पाटील 
वैद्यकीय आरोग्याधिकारी
सांगली मिरज कुपवाड शहर महानरगपालिका