yuva MAharashtra सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या सुपुत्र सुपुत्रीने नेमबाजीत रोवला यशाचा झेंडा !

सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या सुपुत्र सुपुत्रीने नेमबाजीत रोवला यशाचा झेंडा !

फोटो सौजन्य  - दै. लोकमत

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जानेवारी २०२५

सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांचे सुपुत्र आदित्य व सुपुत्री शरयु यांनी देशाच्या राजधानीतील पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत यशाचा झेंडा रोवला आहे. आदित्य व शरीर मोरे यांनी 12 बोअर शॉटगन ट्रॅप या प्रकारात निष्णात नेमबाज होण्याचा बहुमान पटकावला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे हेही उत्तम नेमबाज आहेत. त्यांनीही यापूर्वी विविध नेमबाजी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. पुण्यातील डी वाय पाटील इन्स्टिट्यूट मध्ये आदित्य मोरे हा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी चे शिक्षण घेत आहे तर शरयू मोरे ही बारामती येथील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गात शिकते आहे. आपल्या करिअरच्या दृष्टीने उत्तम उच्चशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी नाही नैपुण्य मिळवले आहे. 


कोल्हापूर येथील जे बी कुसाळे शूटिंग फाउंडेशन चे या मोरे बंधू भगिनींना मार्गदर्शन लाभत आहे. आपल्या पित्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदित्य व शरयू यांनी अनेक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवले आहे. दिल्ली येथील स्पर्धेत देशभरातून हजारहून अधिक खेळाडू पात्र ठरले होते. अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या १२ बोअर शॉटगन- ट्रॅप या क्रीडा प्रकारात दोघांनी यश मिळवले. दोघांनाही विजेतेपदासह 'निष्णात नेमबाज' होण्याचा बहुमान मिळवला. शरयू हिने राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी पाच सुवर्ण, एक रौप्य, तर दोन कास्य पदकांची कमाई केली आहे. बालेवाडी (पुणे) येथील प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांचे दोघांना मार्गदर्शन लाभले आहे. आदित्य व शरयु यांच्यावर या यशाबद्दल पोलीस दलातून तसेच क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.