| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ सप्टेंबर २०२४
भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर भडकावू वक्तव्य केल्यामुळे कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील हे तिरंगा रॅलीच्या माध्यमातून मध्यरात्री ठाण्यात दाखल झाले. या रेल्वेत मोठी अशी साधारण दोन हजार वाहने होते. शेकडो कार्यकर्ते इम्तियाज जलील यांच्या आवाहनावरून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना जकात नाका आनंदनगर येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधन इम्तियाज जलील जिल्हाधिकारी व मुंबई अप्पर पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन कोणासही न सांगता निघून गेले. जलील निघून गेल्याचे आंदोलनकर्त्यांना ठाऊक नव्हते. जेव्हा ही बातमी समजली तेव्हा सारेच भडकले. यादरम्यान जलील यांचा मोबाईल फोनही बंद होता. त्यामुळे आगीत तेल ओतल्याचा प्रकार घडला. आम्ही दोन दिवसापासून उपाशी तापाशी आहोत, इम्तियाज जलील ला येथे बोलवा असा आरडाओरडा आंदोलन करीत होते. बराच वेळ झाला तरी इम्तियाज जरीन न आल्याने आंदोलनकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखून धरला. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून या आंदोलनाकर्त्यांना पिटाळून लावले व शंभर ते दीडशे आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
इम्तियाज जलील यांच्या या कृत्याने एम आय एम च्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, जलील हे असे कृत्य कसे काय करू शकतात ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आता एम आय एम चे नेते त्यांच्यावर काय कारवाई करतात का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.