| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
टेलर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने राज्याध्यक्ष श्री. बसवराज पाटील उर्फ रंजनीकांत यांच्या पुढाकाराने सांगली शहरात तीन दिवसाचे टेलर एक्सपोचे भव्य आयोजन कल्पद्रूम ग्राउंड, नेमिनाथ नगर, विश्रामबाग, सांगली या ठिकाणी करण्यात आले होते. टेलरिंग व्यवसायातील व्यवसायिकांना व त्यावर आधारित असणाऱ्या कंपनीची माहिती होण्यासाठी महाराष्ट्रातून चाळीस हजार टेलर व्यवसायिक बंधू सांगली शहरात एकत्र येऊन सांगलीच्या इतिहासात प्रथमच टेलर एक्सपोचेआयोजन करण्यात आले होते. याचा समारोप नुकताच झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रवक्ते श्री. संतोष पाटील म्हणाले की, सांगलीमध्ये प्रथमच राज्याध्यक्ष श्री. बसवराज उर्फ रंजनीकांत पाटील, राज्यसचिव श्री. शशिकांत कोपर्डे, श्री. रवींद्र गोंदकर, मश्री. सुनील कापसे, श्री. शहाबाज झारी, श्री. गणेश शेटे, के.पांडुरंग, करमुसे टेलर, अप्सरा टेलर यांच्या प्रमुख पुढाकाराने टेलरिंग क्षेत्राशी निगडित उत्पादकांसाठी आणि विक्रेत्यासाठी एकाच छताखाली सर्व काही उपलब्ध व्हावे, यासाठी अनेक दिवस-रात्र मेहनत करून, नीट-नेटक्या नियोजनामुळे देशात प्रथमच झालेल्या या टेलर एक्सपोची देशातील इतिहासात नोंद घेतली जाईल व सांगलीच्या ऐतिहासिक डायरीमध्ये याची ठळक अक्षराने नोंद घ्यावी लागेल, अशा शब्दात प्रवक्ते श्री. संतोष पाटील यांनी उपस्थित टेलर बांधवांच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
संतोष पाटील म्हणाले की, या शानदार टेलर एक्सपो २४ चे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थित फित कापून केले, याचा बहुमान सर्व टेलर बांधवांना व सांगलीकरांना जातो. जेव्हा मंत्री महोदय ना.उदय सामंत साहेब यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर म्हणाले की कुठे आहे रंजनीकांत यावरून राज्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राने घेतली आहे असे वाटते. भविष्यातआपल्या संघटनेला लागेल ते मदत करण्यास मी तयार आहे असे आश्वासन देतो.
यावेळेला माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (सरकार), खासदार विशाल दादा पाटील, राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर साहेब, तासगाव-कवठेमंकाळच्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील, शिवसेना (उबाटा) गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, भाजपचे राज्य समन्वयक शेखर इनामदार, युवा नेते समित दादा कदम, युवा नेते ताजुद्दीन तांबोळी या सर्वांनी राज्यातून आलेल्या टेलर व्यवसायिकांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही महाराष्ट्रातून आलेल्या टेलर बांधवांच्या व सांगली करांच्या वतीने मी आभार मानतो असे हे श्री संतोष पाटील यांनी शेवटी सांगितले.
या वेळी टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद व टेलर कारागीर वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते टेलर वेल्फेअर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष श्री. बसवराज उर्फ रजनीकांत पाटील यांचा सत्कार केला.