| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
पहिली साहामाही व दुसरी साहामाही घरपट्टी बिलाचे वाटप मे २०२४ महिन्यामध्ये करण्यात आले आहे. ३० जून अखेर संपूर्ण घरपट्टी भरणाऱ्या मिळकत धारकास सामान्य करात १०% व ३१ जुलै अखेर ५% सवलत देण्यात आली होती. त्यास घरपट्टीधारकांनी उत्तम असा प्रतिसाद देऊन या योजनेचा लाभ घेऊन महापालिकेच्या उत्पन्नात भर केली आहे.
अद्याप ज्यांना घरपट्टी बिल मिळाले नसेल, तर कार्यालयाशी संपर्क साधून बिल प्राप्त करून घेऊन मुदतीत बिल भरणा करून लाभ घ्यावा. चालू वर्षामधील पहिल्या सहा महिन्यांची मुदत ३०सप्टेंबर अखेर संपत आहे महापालिका अधिनियम मधील तरतुदी नुसार पहिल्या साहामाही बिलाच्या रक्कमे वर महिना 2% शास्तीची (दंड/व्याज)आकारणी 1 ऑक्टोबर-२०२४ पासून चालू होणार आहे.
तरी नागरिकांनी ३० सप्टेंबर अखेर आपली घरपट्टीची बिले वेळेत भरून महिना 2 % लावण्यात येणारी शास्ती (दंड/व्याज) टाळून महापालिकेस सहकार्य करावे, महापालिका तर्फे नागरिकांना आपली घरपट्टी बिले भरण्यासाठी ऑनलाईन, युपीआय, वेबसाईटची व भरणा केंद्राची सोय करण्यात आली आहे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी केले आहे.